आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या आयपीएलमध्ये व्यस्त आहे. विराट कोहलीला बुधवारी चेन्नई सुपर किंग्जसोबत सामना खेळायचा आहे. सामन्यापूर्वी विराट कोहली जिममध्ये घाम गाळताना दिसला. यावेळी त्याच्यासोबत त्याची पत्नी अनुष्का शर्माही दिसली.
विराट कोहलीने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर दोन व्हिडिओ शेअर केले. ज्यामध्ये विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मासोबत जिम करत आहे. किंग कोहलीने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, तो त्याच्या आवडत्या जिम पार्टनरसोबत परतला आहे.
व्हिडिओमध्ये विराट कोहली वेटलिफ्टिंग करत आहे, तर अनुष्का शर्मा देखील बॅकग्राउंडमध्ये व्यायाम करत आहे. अनुष्का शर्मा सध्या विराट कोहलीसोबत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू कॅम्पमध्ये आहे.
नुकताच अनुष्का शर्माने तिचा वाढदिवस साजरा केला, तेव्हा देखील विराट कोहलीने आपल्या पत्नीसाठी एक खास संदेश शेअर केला होता. विराट कोहलीने गेल्या सामन्यात अर्धशतक झळकावले होते, त्यावेळी अनुष्का शर्मा स्टेडियममध्येच उपस्थित होती.
विराट कोहलीबद्दल बोलायचे झाले तर तो बऱ्याच दिवसांपासून खराब फॉर्ममधून जात आहे. शेवटच्या सामन्यात झळकलेल्या अर्धशतकाने त्याचा आत्मविश्वास नक्कीच उंचावला, पण तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. विराट कोहलीने आतापर्यंत 10 सामन्यात 186 धावा केल्या आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.