आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअनेक खेळाडू, प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचार्यांना कोरोनाची लागण झाल्याने इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल -2021) 14 वा सिझन अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे. खेळाडूंमधील वाढत्या संक्रमणामुळे बर्याच संघांनी सामना खेळण्यास नकार दिला. परंतु आता एक मोठी बातमी समोर येत आहे की, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे काही मोठे अधिकारी (बीसीसीआय) संक्रमणाची प्रकरणे दडपवण्याची तयारी करीत होते, जेणेकरून लीग पूर्ण होऊ शकेल.
RCB ने दिले खेळाडूंच्या सुरक्षेला प्राधान्य
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यात अहमदाबाद येथे 3 मे रोजी आयपीएल सामना होणार होता. सूत्रांच्या माहितीनुसार, सामन्याच्या एक दिवस आधी केकेआरचे दोन खेळाडू वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर पॉझिटिव्ह आढळून आले होते. बोर्डाचे काही अधिकारी त्या खेळाडूंना आयसोलेट करून ते जखमी असल्याचे सांगू इच्छित होते. परंतु ही गोष्ट आरसीबीपर्यंत पोहोचली आणि खेळाडूंच्या सुरक्षेचा विचार करता संघाने सामना खेळण्यास स्पष्ट नकार दिला. यानंतर बीसीसीआय आणि आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलने हा सामना पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतर संक्रमितांची संख्या वाढली
मुंबई इंडियन्स (MI) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यातील सामना 4 मे रोजी दिल्ली येथे होणार होता. या सामन्याआधी हैदराबादचा खेळाडू वृद्धिमान साहा कोरोना पॉझिटिव्ह झाला. तसेच चेन्नई सुपर किंग्ज (CSK)चा गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी आणि अन्य दोन सहाय्यक कर्मचारीही पॉझिटिव्ह आले.त्यानंतर चेन्नईच्या माईक हसीलाही संसर्ग झाला. यानंतर हैदराबाद आणि मुंबई यांच्यातील सामनाही पुढे ढकलण्यात आला.
फ्रँचायझीसोबत झालेल्या बैठकीतही आयपीएल वाचवण्याचा प्रयत्न झाला होता
अनेक खेळाडूंना लागण झाल्यानंतर बीसीसीआय आणि आयपीएल फ्रँचायझी यांच्यात बैठक झाली. बैठकीतही काही बोर्ड अधिकारी त्यांच्यावर लीग सुरू ठेवण्यासाठी दबाव आणत असल्याचे सूत्रांकडून समजते. परंतु आरसीबीचे व्यवस्थापन तसेच मुंबई इंडियन्सचे आकाश अंबानी आणि दिल्ली कॅपिटल्सचे पार्थ जिंदल यांनी तात्काळ आयपीएल स्थगित करण्याच्या बाजूने उभे राहिले. त्यानंतर लीग स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.