आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उदयोन्मुख तारा:विव्रांत शर्माची कहाणी, पदार्पणातच तडाखेबंद फलंदाजी, वडिलांना बनवायचे होते बॉक्सर

जम्मू8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विव्रांत शर्मा... जम्मूच्या रस्त्यांवर क्रिकेटचे धडे गिरवलेला 23 वर्षांचा मुलगा. आज त्याच्या नावाची चर्चा आहे. कारण, रविवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयपीएल लीग सामन्यात विव्रांत शर्माने सनरायझर्स हैदराबादकडून जोरदार पदार्पण केले.

आयपीएलच्या इतिहासात पदार्पणाच्याच डावात तो सर्वाधिक धावा करणारा भारतीय खेळाडू ठरला. विव्रांतने 47 चेंडूंत 69 धावांची खेळी खेळली, ज्यात त्याने 9 चौकार आणि 2 षटकार मारले. विव्रांतला SRH ने मिनी लिलावात 2.60 कोटींमध्ये खरेदी केले होते. यापूर्वी तो नेट गोलंदाज म्हणून संघाशी जोडला गेला होता.

विव्रांतचे वडील सुशील शर्मा यांची इच्छा होती की, त्याने आणि त्याचा मोठा भाऊ विक्रांत शर्मा यांनी बॉक्सर व्हावे. सुशील शर्मा यांनी राज्य स्तरावर बॉक्सिंगमध्ये जम्मू-काश्मीरचे प्रतिनिधित्व केले होते. 2015 मध्ये किडनी निकामी झाल्याने त्यांचे निधन झाले. त्यावेळी विव्रांत अवघा 14 वर्षांचा होता.

त्याचा मोठा भाऊ विक्रांत आणि मोठ्या बहिणीने त्याची काळजी घेतली. त्यांच्या आईचेही वयाच्या 5व्या वर्षी निधन झाले होते. मोठा भाऊ विक्रांतने विव्रांतच्या क्रिकेट कारकिर्दीसाठी आपली कारकीर्द पणाला लावली. वडील गेल्यानंतर त्याने क्रिकेट सोडले आणि कुटुंबाची काळजी घेतली आणि विव्रांतला क्रिकेटर बनवण्यावर पूर्ण लक्ष केंद्रित केले.

लहान भाऊ विव्रांतच्या आयपीएलमधील शानदार पदार्पणानंतर विक्रांतने दिव्य मराठीशी संवाद साधला आणि सांगितले की, आज विक्रांतने त्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. दोन महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर भावाला संधी मिळाली. विक्रांतशी झालेल्या संवादातील काही अंश सादर करत आहोत

प्रश्न- विव्रांतच्या पदार्पणाच्या खेळीकडे तुम्ही कसे पाहता? या हंगामात पदार्पण करण्याची आशा होती?
उत्तर- विव्रांतच्या या खेळीने मी खुश आहे. मिळालेल्या संधीचा फायदा उठवत त्याने सर्वोत्तम कामगिरी केली. तथापि, SRH प्ले-ऑफमध्ये पोहोचू शकली नाही हे वेदनादायक आहे. आयपीएलचा हा मोसम सुरू होण्यापूर्वी त्याला काही सामन्यांनंतर संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. पण संघात स्थान मिळवू शकला नाही, पण एक-दोन सामन्यांत त्याला नक्कीच संधी मिळेल, याची खात्री होती.

प्रश्‍न- आयपीएल सीझन संपत असताना विव्रांतला संधी मिळाली, अशा स्थितीत त्याच्यासोबत तुमचा काय संवाद झाला?
उत्तर- संधी न मिळाल्याने विव्रांत नक्कीच थोडा निराश झाला होता. पण मी त्याला नेहमी सांगायचो की, विश्वास ठेव आणि धीर धर.

प्रश्‍न- विव्रांत क्रिकेटची सुरुवात कशी झाली? तुमचे वडील तर बॉक्सर होते..
उत्तर- माझ्या वडिलांचा केमिकलचा व्यवसाय होता. आम्ही दोन भाऊ आणि एक बहीण आहोत. मी आझाद क्रिकेट स्टेडियम कोचिंग सेंटरमध्ये प्रशिक्षक रणधीर सिंग (राजन सर) यांच्याकडे क्रिकेटचे प्रशिक्षण घेण्यासाठी जात असे. विव्रांत माझ्यापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. वयाच्या 6व्या वर्षापासून तोही माझ्यासोबत राजन सरांकडे जाऊ लागला. मी क्लब स्तरावरही क्रिकेट खेळलो आहे. मी डाव्या हाताचा फिरकी गोलंदाजही होतो. मला पाहून त्याने गोलंदाजी सुरू केली. राजन सरांनी आम्हा दोघांना क्रिकेटच्या बारीकसारीक गोष्टी समजावून सांगितल्या. तर माझ्या वडिलांनी बॉक्सिंगमध्ये राज्यस्तरावर पदक जिंकले होते. त्यांना आम्हाला फक्त बॉक्सर बनवायचे होते. त्यांनी मला बॉक्सिंग रिंगमध्येही नेले. पण मला ते आवडले नाही. माझी आवड पाहून माझ्या वडिलांनी क्रिकेट खेळू देण्यास होकार दिला.

विव्रांत शर्माने वयाच्या 6 व्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती.
विव्रांत शर्माने वयाच्या 6 व्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती.

प्रश्न- विव्रांतला क्रिकेटर बनवण्यासाठी तुम्ही तुमचे करिअर पणाला लावले. आता विव्रांतच्या चांगल्या कामगिरीनंतर हा निर्णय योग्य होता असे तुम्हाला वाटते का?
उत्तर- 2015 मध्ये वडील आम्हाला सोडून गेले. आमच्या आईचे 2005 मध्ये निधन झाले. त्यावेळी विव्रांत 4 वर्षांचा असेल. त्यानंतर आम्हा तिन्ही भावंडांचा सांभाळ वडिलांनी केला. मी विव्रांतपेक्षा 10 वर्षांनी मोठा आहे. आई गेल्यानंतर मी विव्रांतला सांभाळायचो. आमच्यात खूप जवळीक निर्माण झाली.

त्यानंतर विव्रांतची कारकीर्द घडवण्याची जबाबदारी पूर्णपणे माझ्यावर येऊन पडली. वडिलांच्या निधनाच्या वेळी विव्रांतचे वय 15 वर्षे होते. त्याने जम्मूपासून राज्य स्तरीय खेळण्यास सुरुवात केली. विव्रांत क्रिकेटमध्ये काहीतरी करू शकतो, असे मला वाटले. त्याला चांगली तयारी करता यावी म्हणून मीही त्याच्यासोबत पुन्हा स्टेडियममध्ये जाऊ लागलो.

मी हळूच क्रिकेटचा निरोप घेतला. पण, विव्रांत आझाद क्रिकेट स्टेडियम कोचिंग सेंटरमध्ये प्रशिक्षक रणधीर सिंग (राजन सर) यांच्याकडे जात राहिला. मला वाटते की, माझा निर्णय अगदी योग्य होता. मला खात्री आहे की, तो टीम इंडियातही आपले स्थान निर्माण करण्यात यशस्वी होईल.

विव्रांत (खाली डावीकडे प्रथम बसलेला) याला अंडर-16 जम्मू क्रिकेट संघात संधी मिळाली होती.
विव्रांत (खाली डावीकडे प्रथम बसलेला) याला अंडर-16 जम्मू क्रिकेट संघात संधी मिळाली होती.

प्रश्न- विव्रांत सनरायझर्स हैदराबादच्या संपर्कात कसा आला?
उत्तर- विव्रांत गेल्या मोसमापासून नेटबॉलर म्हणून सनरायझर्स हैदराबादशी जोडला गेला आहे. त्याला तिथे नेण्याचे श्रेय जम्मूचा खेळाडू आणि सनरायझर्स हैदराबादकडून खेळणाऱ्या अब्दुल समदला जातो. मी आणि माझा भाऊ विव्रांत मौलाना आझाद क्रिकेट स्टेडियम कोचिंग सेंटरमध्ये प्रशिक्षक रणधीर सिंग (राजन सर) यांच्याकडे प्रशिक्षण घेण्यासाठी जातो. अब्दुल समद आणि उमरान मलिक दोघेही तिथे सराव करतात.

गेल्या मोसमात जेव्हा डावखुरा फिरकीपटू राशिद खान सनरायझर्स हैदराबादमधून दुसऱ्या फ्रँचायझीमध्ये गेला तेव्हा ते डावखुरा फिरकी गोलंदाज शोधत होते. विव्रांत हा डावखुरा फिरकीपटू आहे. समद त्याच्या चेंडूंवर फलंदाजीचा सराव करतो. समदने सनरायझर्स हैदराबादच्या कोचिंग स्टाफला विव्रांतबद्दल सांगितले. त्याची गोलंदाजी आणि फलंदाजीचा व्हिडिओ बनवून सनरायझर्स हैदराबादच्या कोचिंग स्टाफला पाठवला. नंतर विव्रांतला एसआरएचने हैदराबादला बोलावले. त्यानंतर त्याची नेटबॉलर म्हणून निवड झाली.

प्रश्न- विव्रांतच्या गोलंदाजी आणि फलंदाजीतील सुधारणेचे श्रेय कुणाचे?
उत्तर- ब्रायन लारा आणि मुथय्या मुरलीधरन आणि बिशन सिंग बेदी यांच्यासह जम्मूचा रणजीपटू मिथुन मिन्हास यांनी विव्रांतची गोलंदाजी आणि फलंदाजी सुधारली. सनरायझर्स हैदराबादमध्ये विव्रांत जेव्हा नेट बॉलर बनला तेव्हा तिथल्या कोचिंग स्टाफचा भाग असलेल्या ब्रायन लाराने त्याच्या बॅटिंगवर काम केले. त्याचवेळी ऑफस्पिनर मुथय्या मुरलीधरनने गोलंदाजी सुधारण्यास मदत केली.
त्याचवेळी विव्रांत 14 वर्षांचा असताना त्याची उत्तर विभागीय शिबिरात निवड झाली. त्यावेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू बिशनसिंग बेदी यांनी गोलंदाजी सुधारण्यात खूप मदत केली. त्यानंतर त्याच्या गोलंदाजीत बरीच सुधारणा झाली.