आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयपीएल:वॉर्नर, पॉवेलच्या झंझावाताने दिल्लीचा पाचवा विजय; हैदराबाद संघ पराभूत, ऋषभच्या दिल्ली कॅपिटल्स संघाचा 21 धावांनी शानदार विजय

मुंबई19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सामनावीर डेव्हिड वॉर्नर (नाबाद ९२) आणि रोवमान पॉवेलच्या (नाबाद ६७) झंझावातापाठाेपाठ खलील अहमद (३/३०) व शार्दूल ठाकूरने (२/४४) शानदार गोलंदाजीतून दिल्ली कॅपिटल्स संघाला गुरुवारी आयपीएलमध्ये पाचवा विजय मिळवून दिला. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स संघाने लीगमधील दहाव्या सामन्यामध्ये विलियम्सनच्या सनरायझर्स हैदराबादला पराभूत केले. दिल्ली संघाने २१ धावांनी धडाकेबाज विजय साजरा केला. दिल्ली संघाने प्रथम फलंदाजी करताना तीन गड्यांच्या माेबदल्यात हैदराबादसमाेर विजयासाठी २०८ धावांचे टार्गेट ठेवले हाेते. प्रत्युत्तरात हैदराबाद संघाने आठ गडी गमावून १८६ धावांपर्यंत मजल मारली. संघाकडून पुरनने ३४ चेंडूंत ६ षटकार व २ चाैकारांस ६२ धावांची खेळी केली. मात्र, त्याला टीमचा पराभव टाळता आला नाही. या विजयासह दिल्लीने गुुणतालिकेत पाचव्या स्थानी धडक मारली. पाचव्या पराभवामुळे हैदराबाद संघाची सहाव्या स्थानी घसरण झाली.

आठ वर्षांनंतर आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळत असलेल्या डेव्हिड वॉर्नरने (नाबाद ९२) अर्धशतक झळकावले. त्याचे आयपीएल करिअरमधील हे ५४ वे अर्धशतक ठरले. कर्णधार ऋषभ पंतने (२६) नवव्या षटकात गोपालच्या चेंडूंवर सलग षटकारांची हॅट््ट्रिक साजरी केली. सलग तीन षटकार व एक चाैकार मारल्यानंतर ताे पाचव्या चेंडूवर बाद झाला. पॉवेलने (नाबाद ६७) शेवटच्या षटकात १ षटकार व सलग तीन चाैकार मारले.

धावफलक, नाणेफेक हैदराबाद (गोलंदाजी)
दिल्ली कॅपिटल्स धावा चेंडू ४ ६
मनदीप झे.पुरन गो. भुवनेश्वर ०० ०५ ०० ०
डेव्हिड वॉर्नर नाबाद ९२ ५८ १२ ३
मिशेल मार्श झे.गो. अॅबोट १० ०७ ०२ ०
ऋषभ पंत त्रि.गो. गोपाल २६ १६ ०१ ३
रोवमान पॉवेल नाबाद ६७ ३५ ०३ ६
अवांतर : १२, एकूण : २० षटकांत ३ बाद २०७ धावा. गडी बाद हाेण्याचा क्रम : १-०, २-३७, ३-८५ गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार ४-१-२५-१, सीन अॅबोट ४-०-४७-१, उमरान मलिक ४-०-५२-०, कार्तिक त्यागी ४-०-३७-०, श्रेयस गोपाल ३-०-३४-१, अॅडेन मार्कराम १-०-११-०.
सनरायझर्स हैदराबाद धावा चेंडू ४ ६
अभिषेक झे.कुलदीप गो. अहमद ०७ ०६ ०१ ०
विलीयम्सन झे.ऋषभ गो. नोर्टजे ०४ ११ ०१ ०
राहुल त्रिपाठी झे. शार्दूल गो. मार्श २२ १८ ०२ १
मार्कराम झे.कुलदीप गो. अहमद ४२ २५ ०४ ३
पुरन झे.पॉवेल गो. शार्दूल ६२ ३४ ०२ ६
शशांक झेे. नोर्टजे गो. शार्दूल १० ०६ ०२ ०
अॅबोट झे.पटेल गो. अहमद ०७ ०५ ०० १
श्रेयस गोपाल नाबाद ०९ ०७ ०२ ०
कार्तिक त्यागी त्रि.गो. कुलदीप ०७ ०५ ०१ ०
भुवनेश्वर कुमार नाबाद ०५ ०३ ०१ ०
अवांतर : ११, एकूण : २० षटकांत ८ बाद १८६ धावा. गडी बाद हाेण्याचा क्रम : १-८ ,२-२४, ३-३७, ४-९७, ५-१३४, ६-१५३, ७-१६५, ८-१८१ गोलंदाजी : शार्दूल ठाकूर ४-०-४४-२, खलील अहमद ४-०-३०-३, अनरीच नोर्टजे ४-०-३५-१, मिशेल मार्श ४-०-३६-१, कुलदीप यादव ४-०-४०-१.
सामनावीर : डेव्हिड वॉर्नर

बातम्या आणखी आहेत...