आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइंडियन प्रीमियर लीगमध्ये सोमवारी चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात सर्वात रोमांचक सामना झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूने लखनऊसमोर 213 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. जे एलएसजीने शेवटच्या चेंडूवर 1 गडी राखून पूर्ण केले. या विजयानंतर लखनऊ संघाच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्याचवेळी एक परदेशी खेळाडू देखील या सामन्याचा भाग होता. जो IPL दरम्यानच ड्रग्जच्या आरोपाखाली पकडला गेला होता.
तोच हा दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी वेगवान गोलंदाज वेन पारनेल आहे. ज्याने 2011 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले. यानंतर त्याने 2012 च्या आयपीएल हंगामातही भाग घेतला होता. पारनेल आयपीएलच्या चौथ्या मोसमात पुणे वॉरियर्स इंडियाचे प्रतिनिधित्व करत होता. त्या हंगामात त्याने KKR विरुद्ध 'करो या मरो' या भूमीकेत मॅच खेळली पण यात पुणे संघ बाद झाला. त्यानंतर वेन पारनेल भारतीय खेळाडू राहुल शर्मासोबत पार्टीला गेला. जिथे पोलिसांनी त्यांना पकडले.
मुळात, ही तर रेव्ह पार्टी होती. दोन्ही खेळाडूंची ड्रग टेस्ट करण्यात आली, त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले. विशेष म्हणजे दोघांचाही चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने घबराट पसरली होती. आपले स्पष्टीकरण देताना दोन्ही खेळाडूंनी सांगितले होते की, आपल्याला या रेव्ह पार्टीबद्दल काहीही माहिती नाही, ते कोणाच्या तरी वाढदिवसानिमित्त पार्टीला आलेले होते.
2011 मध्ये बदलला धर्म वेन पारनेल हा दक्षिण आफ्रिकेच्या स्टार खेळाडूंपैकी एक आहे. तो पूर्वी ख्रिश्चन धर्मावर विश्वास ठेवत असे. पण अचानक त्याने 2011 मध्ये 22 व्या वाढदिवसाला धर्म बदलला. पारनेल 30 जुलै 2011 रोजी मुस्लिम धर्म स्वीकारला. इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर त्याने आपले नावही बदलले. आफ्रिकन खेळाडूने आपले नाव वेन डिलन पारनेलवरून बदलून वेन वालीद पारनेल केले. इतकंच नाही तर 2016 मध्ये पारनेलने आयशा बेकर नावाच्या फॅशन ब्लॉगरसोबत मशिदीत लग्न देखील केले.
IPL-2023मध्ये पुन्हा जोरदार कमबॅक रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने जखमी झालेल्या रीस टॉपेलच्या जागी 30 वर्षीय वेन पारनेलला बोलावले. अशा स्थितीत लखनऊविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात पारनेलने चमकदार कामगिरी केली. त्याने आपल्या स्पेलच्या पहिल्याच षटकात दीपक हुडा आणि कृणाल पंड्याला बाद केले. वेनने 4 षटकांच्या स्पेलमध्ये 41 धावांत एकूण 3 बळी घेतले. 2014 पासून, पारनेल प्रथमच आयपीएलमध्ये खेळत आहे. 9 वर्षांनंतर तो पहिला आयपीएलमध्ये उतरला आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.