आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Ipl
  • Winning Four Against Hyderabad Team Gives Delhi A Chance Today, Hyderabad Delhi Match, Launch In The Evening. From 7.30 P.m.

मॅच प्रिव्ह्यू:हैदराबाद संघाविरुद्ध विजयी चौकाराची आज दिल्लीला संधी, मुंबईच्या ब्रेबॉर्न मैदानावर दोन्ही संघ आमनेसामने

मुंबई14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

युवा कर्णधार ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स टीम आयपीएलमध्ये विलियम्सनच्या सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध विजयी चौकार मारण्यासाठी सज्ज झाला आहे. हे दोन्ही संघ मुंबईच्या मैदानावर गुरुवारी समोरासमोर असतील. या दोन्ही संघांचा यंदाच्या सत्रात पहिलाच सामना या ब्रेबॉर्न मैदानावर रंगणार आहे. या मैदानावर दिल्ली संघाचे पारडे जड मानले जाते. टीमने या मैदानावर आतापर्यंत तीन सामने खेळले. या तिन्ही सामन्यांमध्ये दिल्लीला विजयाची नोंद करता आली. त्यामुळे ऋषभ पंतचा दिल्ली संघ विजयी चौकार मारण्याच्या इराद्यानेच या मैदानावर उतरणार आहे. तसेच हैदराबाद संघाने यंदा या मैदानावर दोन सामने खेळले. या दोन्ही सामन्यांमध्ये हैदराबाद संघ विजयी झाला.

आतापर्यंत हैदराबाद आणि दिल्ली यांच्यामध्ये २० सामने झाले. यातील ११ सामन्यांमध्ये हैदराबाद संघ विजेता ठरला. नऊ सामने दिल्ली संघाने जिंकले.

हैदराबाद : फलंदाजी, गोलंदाजी मजबूत
संथ सुरुवात करणाऱ्या हैदराबाद संघाने आता विजयी मोहीम कायम ठेवताना गुणतालिकेत टॉप-४ मध्ये धडक मारली. त्यामुळे टीमची फलंदाजी आणि गोलंदाजी अधिक मजबूत आहे. त्याचा निश्चित असा मोठा फायदा टीमला आता होत आहे. टीमचा युवा फलंदाज अभिषेक शर्मा १३४.४३ च्या स्ट्राइक रेटने ३००+ धावांसह टॉप स्कोअरर आहे. तसेच मार्करामच्या नावे २६३ धावांची नोंद आहे. संघाचा राहुल त्रिपाठी हा यशस्वीपणे मॅचविनरची भूमिका बजावत आहे. गोलंदाजीमध्ये उमरान मलिकने आपला दबदबा निर्माण केला. त्याच्या नावे ९ सामन्यांमध्ये १५ बळींची नोंद आहे. भुवनेश्वर कुमारही चांगली गोलंदाजी करत आहे.

दिल्ली : पृथ्वी-डेव्हिड वॉर्नरवर मदार
दिल्ली संघाची नजर आता गुणतालिकेत आगेकूच करण्याकडे लागली आहे. टीमने आतापर्यंत चार सामने जिंकून सातवे स्थान गाठले. आता पाचव्या विजयासाठी दिल्ली संघ उत्सुक आहे. यासाठी दिल्ली संघाच्या विजयाची मदार ही सलामीवीर पृथ्वी शॉ आणि डेव्हिड वॉर्नरवर आहे. गत दोन सामन्यांपासून पृथ्वी शॉला समाधानकारक खेळी करता आली नाही. त्यामुळे आता त्याला मोठी खेळी करावी लागणार आहे. त्याने ९ डावांमध्ये २५९ धावा काढल्या आहेत. तसेच सात डावांत डेव्हिड वॉर्नरने २६४ धावा काढल्या अाहेत. यासह ताे टीमचा यंदा टॉप स्कोअरर आहे. तसेच कर्णधार ऋषभ पंतही चांगला फॉर्मात आहे. गोलंदाजीमध्ये कुलदीप यादव आणि खलील अहमदची कामगिरी लक्षवेधी ठरत आहे. मात्र खलील दोन सामन्यांत खेळू शकला नाही. आता त्याला संधी मिळण्याची शक्यता आहे. शार्दूल ठाकूर आणि अक्षर पटेलही फॉर्मात आहेत.

बातम्या आणखी आहेत...