आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासामनावीर डॅनियल सॅम्स (३/१६), मेडरिथ (२/२७) व कुमार कार्तिकेयच्या (२/२२) शानदार गोलदंाजीपाठोपाठ तिलक वर्माने (नाबाद ३४) केलेल्या झंझावाती खेळीच्या बळावर मुंबई इंडियन्सने आयपीएलमध्ये तिसरा विजय संपादन केला. मुंबई संघाने १४.५ षटकांत चेन्नईवर पाच गड्यांनी मात केली. या विजयासह मुंबई संघाने गुरुवारी गत चॅम्पियन चेन्नई सुपरकिंग्ज संघाला बाहेरचा रस्ता दाखवला. प्लेऑफ प्रवेशासाठी धाेनीच्या चेन्नई संघाला विजय आवश्यक होता. मात्र, सुमार फलंदाजी व गोलंदाजीने चेन्नईच्या आशेवर पाणी फेरले. प्रथम फलंदाजी करताना चेन्नई संघाचा १६ षटकांत अवघ्या ९७ धावांत धुव्वा उडाला होता. रोहितच्या नेतृत्वात मुंबई संघाने अावाक्यातले लक्ष्य पाच गड्यांच्या माेबदल्यात यशस्वीपणे गाठले. यामुळे चेन्नईला आठव्या पराभवाला सामाेरे जावे लागले.
पराभवाने चेन्नई संघाच्या प्लेऑफ प्रवेशाच्या आशा मिळाल्या धुळीस
चेन्नईची दुसरी नीचांकी धावसंख्या; दोन्ही मुंबईविरुद्धच
चेन्नईला आयपीएलमधील १२ व्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना १६ षटकांत ९७ धावांत डाव गुंडाळावा लागला. त्यामुळे चेन्नईच्या नावे आयपीएलमध्ये दुसऱ्यांदा नीचांकी धावसंख्येची नाेंद झाली. यापूर्वी २०१३ मध्ये मुंबईविरुद्ध सामन्यातच चेन्नई संघाचा ७९ धावांत खुर्दा उडाला होता.
धावफलक, नाणेफेक मंुबई इंडियन्स (गोलंदाजी) चेन्नई सुपरकिंग्ज धावा चेंडू ४ ६ ऋतुराज झे.ईशान गो. सॅम्स ०७ ०६ ०१ ० काॅन्वे पायचीत गो. सॅम्स ०० ०१ ०० ० माेईन झे.शाैकिन गो. सॅम्स ०० ०२ ०० ० उथप्पा पायचीत गो. बुमराह ०१ ०६ ०० ० रायडू झे.इशान गो. मेरेडिथ १० १४ ०२ ० महेंद्र सिंग धाेनी नाबाद ३६ ३३ ०४ ३ शिवम झे.इशान गो. मेरेडिथ १० ०९ ०१ ० ब्राव्हो झे.तिलक गो. कार्तिकेय १२ १५ ०० १ सिमरजित पायचीत गो. कार्तिकेय ०२ ०३ ०० ० थिक्षणा झे. रोहित गो. रमणदीप ०० ०३ ०० ० मुकेश चाैधरी धावबाद (ईशान) ०४ ०४ ०१ ० अवांतर : १५ एकूण : १६ षटकांत सर्वबाद ९७ धावा. बाद क्रम : १-१, २-२, ३-५, ४-१७, ५-२९, ६-३९, ७-७८, ८-८०, ९-८१, १०-९७. गोलंदाजी : डॅनियल सॅम्स ४-०-१६-३, बुमराह ३-१-१२-१, मेरेडिथ ३-०-२७-२, शाैकिन २-०-१२-०, कार्तिकेय ३-०-२२-२, रमनदीप सिंग १-०-५-१. मुंबई इंडियन्स धावा चेंडू ४ ६ ईशान झे. धाेनी गो. मुकेश ०६ ०५ ०१ ० रोहित झे. धाेनी गो. सिमरजित १८ १४ ०४ ० डॅनियल सॅम्स पायचीत गो. मुकेश ०१ ०६ ०० ० तिलक वर्मा नाबाद ३४ ३२ ०४ ० ट्रिस्टन पायचीत गो. मुकेश ०० ०२ ०० ० ऋितक शाैकिन त्रि.गो. माेईन १८ २३ ०२ ० टीम डेव्हिड नाबाद १६ ०७ ०० २ अवांतर : १०, एकूण : १४.५ षटकांत ५ बाद १०३ धावा. गडी बाद क्रम : १-६, २-३०, ३-३३, ४-३३, ५-८१. गोलंदाजी : मुकेश चाैधरी ४-०-२३-३, सिमरजीत ४-०-२२-१, ड्वेन ब्राव्हो २-०-१६-०, महिश थिक्षणा ३-०-२४-०, माेईन अली १.५-०-१७-१.
आयपीएल-2022 गुणतालिका टीम लढत विजय पराभव टाय एन/आर गुण रनरेट गुजरात टायटन्स 12 09 03 00 00 18 +0.376 लखनऊ सुपर जायंट्स 12 08 04 00 00 16 +0.385 राजस्थान रॉयल्स 12 07 05 00 00 14 +0.228 रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 12 07 05 00 00 14 -0.115 दिल्ली कॅपिटल्स 12 06 06 00 00 12 +0.210 सनरायझर्स हैदराबाद 11 05 06 00 00 10 -0.031 कोलकाता नाइट रायडर्स 12 05 07 00 00 10 -0.057 पंजाब किंग्ज 11 05 06 00 00 10 -0.231 चेन्नई सुपरकिंग्ज 12 04 08 00 00 08 -0.181 मुुंबई इंडियन्स 12 03 09 00 00 06 -0.613
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.