आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केएलच्या जागी ईशान खेळणार WTC फायनल:राहुलला IPL मध्ये दुखापत; उमेश-उनाडकटही दुखापतग्रस्त, पण त्यांची रिप्लेसमेंट नाही

मुंबई22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विकेटकीपर फलंदाज केएल राहुलच्या जागी ईशान किशनचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) फायनलसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. बीसीसीआयने सोमवारी एक प्रसिद्धीपत्रक जारी करून ही माहिती दिली. WTC फायनल 7 ते 11 जून दरम्यान लंडनमध्ये होणार आहे.

1 मे रोजी लखनऊच्या एकना स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना केएल राहुलला दुखापत झाली होती. आरसीबीच्या डावाच्या दुसऱ्याच षटकात फाफ डु प्लेसिसचा फटका रोखण्याच्या प्रयत्नात राहुलच्या पायाला दुखापत झाली. त्यानंतर तो मैदानाबाहेर गेला. शेवटी दुखापतग्रस्त असतानाही राहुल फलंदाजीला उतरला.

राहुलच्या पायावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. यानंतर त्याला जवळपास महिनाभर विश्रांती घ्यावी लागणार आहे. अशा स्थितीत 7 ते 11 जून दरम्यान होणाऱ्या WTC फायनलमध्ये खेळणे त्याला शक्य होणार नाही. बीसीसीआयने रिलीजमध्ये उमेश यादव आणि जयदेव उनाडकट यांच्या दुखापतीबद्दल माहिती दिली, परंतु त्यांच्या रिप्लेसमेंटची घोषणा केली नाही. अशा परिस्थितीत हे दोन्ही गोलंदाज खेळण्याची आशा अजूनही आहे.

बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात राहुलच्या स्नायूंमध्ये ताण आला होता.
बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात राहुलच्या स्नायूंमध्ये ताण आला होता.

आयपीएलच्या 16व्या मोसमात 16 खेळाडू दुखापतीमुळे बाहेर गेले आहेत. चेन्नई सुपर किंग्जचे सर्वाधिक खेळाडू आहेत.

रिप्लेसमेंटनंतरचा भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, आय. किशन. स्टँड बाय: ऋतुराज गायकवाड, मुकेश कुमार, सूर्यकुमार यादव.