आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये केली 11 वर्षे पूर्ण:प्रत्येक सामन्याची आठवण लॅपटॉपमध्ये, पदार्पण वर्धापनदिनानिमित्त पोस्ट व्हिडिओ

8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

2011 मध्ये या दिवशी भारताचा माजी कर्णधार आणि महान फलंदाज विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. विराटने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. 11 वर्षात खेळलेली प्रत्येक कसोटी त्याने लॅपटॉपमध्ये ठेवली आहे.

व्हिडिओमध्ये 33 वर्षीय विराट त्याचा लॅपटॉप उघडतो आणि टेस्ट नावाच्या फोल्डरमध्ये त्याचे प्रत्येक सामन्याचे फोटो दिसत आहेत. कोहलीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. विराटने पहिला कसोटी सामना वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला.

गांगुली आणि द्रविड यांनीही आज केले होते पदार्पण

या दिवशी माजी भारतीय कर्णधार विराट कोहली शिवाय सौरव गांगुली आणि राहुल द्रविड यांनीही कसोटी पदार्पण केले. सौरव आणि द्रविड यांनी 1996 मध्ये टीम इंडियासाठी एकत्र पदार्पण केले होते.

सध्या हे तिघेही भारतीय क्रिकेटमध्ये योगदान देत आहेत. विराट भारताकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळत आहे. त्याचबरोबर सौरव गांगुली BCCI चा अध्यक्ष म्हणून काम पाहत आहे. तर राहुल द्रविड संघाच्या प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे.

कोहलीने त्याच्या नेतृत्वाखाली कसोटी जिंकण्याच्या बाबतीत धोनीला मागे टाकले
कोहलीने त्याच्या नेतृत्वाखाली कसोटी जिंकण्याच्या बाबतीत धोनीला मागे टाकले

सर्वाधिक सामने जिंकणारा कर्णधार

विराट कोहली हा भारतीय संघाचा सर्वाधिक कसोटी विजय मिळवणारा कर्णधार आहे. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने 68 पैकी 40 कसोटी जिंकल्या आहेत. त्याचबरोबर धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 60 पैकी 27 कसोटी जिंकल्या आहेत. गांगुलीच्या नेतृत्वाखाली संघाने 21 कसोटी जिंकल्या. विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सर्वाधिक काळ कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे. 42 महिने संघ कसोटीच्या शिखरावर राहिला.

भारतासाठी शंभरहून अधिक कसोटी सामने खेळणारा विराट हा 12 वा भारतीय क्रिकेटपटू आहे. एकूणच त्याच्या आधी जगातील 71 खेळाडूंना ही कामगिरी करता आली आहे.

2019 पासून कोहलीने आपल्या बॅटने कसोटी शतक झळकावलेले नाही. त्याने शेवटचे शतक 23 नोव्हेंबर 2019 रोजी कोलकाता येथे बांगलादेशविरुद्ध केले होते.

बातम्या आणखी आहेत...