आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताचा 9 धावांनी पराभव:संजू सॅमसनची झुंज व्यर्थ, पहिला वनडे सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकला; मालिकेत 1-0 ने आघाडी

लखनऊ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील आजचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेने 9 धावांनी जिंकला. याचबरोबर या संघाने भारताविरुद्ध मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. भारताचा फलंदाज संजू सॅमसनने लौकिकाला साजेसा खेळ केला परंतु, त्याची एकट्याची झुंज कामी आली नाही आणि भारताचा पराभव झाला.

लखनऊच्या एकना स्टेडियमवर 40 षटकांचा सामना झाला. शिखर धवनने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना आफ्रिकन संघाने 40 षटकांत 4 गडी गमावून 249 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने 40 षटकांत 8 गडी गमावून 240 धावा केल्या.

संजूची एकाकी झुंज

भारत 35 व्या षटकापर्यंत मजबूत स्थितीत होता. एकीकडे शार्दूल आणि संजू सॅमसनची जोडी विजयासाठी प्रयत्नशिल असताना झेल देऊन शार्दूल 33 धावांवर बाद झाला. त्यानंतर पाठोपाठ भारताचे दोन गडी बाद झाले. एका बाजूने संजू सॅमसन याने भारताच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या परंतु, त्याच्या एकट्याची झुंज कामी आली नाही. तो 63 चेंडूत 86 धावा काढून नाबाद राहीला.

मॅचचे लाइव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा...

  • कागिसो रबाडाने टीम इंडियाला पहिला धक्का दिला. 7 चेंडूत 3 धावा केल्यानंतर शुभमन गिल त्याच्या चेंडूवर क्लीन बोल्ड झाला.
  • शुभमन गिलचा साथीदार आणि भारतीय संघाचा कर्णधार शिखर धवनची बॅटही आजच्या सामन्यात फ्लॉप ठरली. त्याने 16 चेंडूत 4 धावा केल्या आणि वेन पेर्नेलच्या गोलंदाजीवर तो बाद झाला.
  • हेन्रिक क्लासेनने 74 धावा केल्या. त्याचवेळी डेव्हिड मिलरची बॅटही जोरदार चालली. त्याने 63 चेंडूत 75 धावा केल्या. भारताकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक 2 बळी घेतले. रवी बिश्नोई आणि कुलदीप यादव यांना 1-1 विकेट मिळाली.

पावसामुळे हा सामना 40-40 षटकांचाच​​​​​​

  • शार्दुल ठाकूरने दक्षिण आफ्रिकेला पहिला धक्का दिला. त्याने यनेमन मालनला 22 धावांवर बाद केले.
  • आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बाउमाचा फ्लॉप शो पहिल्या वनडेतही कायम राहिला. 12 चेंडूत केवळ 8 धावा करून तो बाद झाला.
  • कुलदीप यादवने आपल्या पहिल्याच षटकातच अप्रतिम गोलंदाजी केली, त्याने पहिले 3 अप्रतिम चेंडू एडन मार्करामला टाकले, जो उत्कृष्ट फॉर्ममध्ये होता. त्याला त्याचे वळण समजले नाही. तो पूर्णपणे संघर्ष करताना दिसला आणि नंतर क्लीन बोल्ड झाला.
  • रवी बिश्नोईने पहिल्या एकदिवसीय सामन्यात 48 धावा केल्यानंतर पूर्ण सेट डी कॉकला एलबीडब्ल्यू बाद केले.
  • शार्दुल ठाकूर 9व्या षटकात गोलंदाजी करायला आला आणि दुसऱ्या चेंडूवर त्याने मलानचा सोपा झेल सोडला.
  • रवी बिश्नोई आणि ऋतुराज गायकवाड यांनी पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताकडून पदार्पण केले आहे.

दोन्ही संघांचे प्लेइंग-11

भारत: शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, इशान किशन, संजू सॅमसन, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, आवेश खान आणि मोहम्मद सिराज.
दक्षिण आफ्रिका : क्विंटन डी कॉक, येनेमन मलान, टेम्बा बाउमा (कर्णधार), एडन मार्कराम, हेन्रिक क्लासेन, डेव्हिड मिलर, वेन पारनेल, केशव महाराज, लुंगी एनगिडी, तबरेझ शम्सी आणि कागिसो रबाडा.

दक्षिण आफ्रिका त्यांच्या पूर्ण ताकदीच्या मैदानात उतरेल

BCCI ने सांगितले की, सामना अर्धा तास उशिराने सुरू होईल. ​​​​​​नाणेफेक दुपारी 1.30 वाजता होणार आहे. तर सामना दुपारी 2 वाजता सुरू होईल.

पण या वनडे सामन्यात एक धोका आहे, जो चाहत्यांची निराशा करू शकतो. जाणून घेऊ या काय आहे तो धोका, खेळपट्टीचा अहवाल, प्लेइंग -11 आणि महत्त्वाच्या रेकॉर्ड्स बद्दल…

सामन्यादरम्यान पावसाची शक्यता

लखनऊ वनडे सामन्यातील पावसामुळे सामन्याची मजा खराब होऊ शकते. दिवसभरात पावसाची 93% शक्यता वर्तवली आहे. समजा, जर इंद्र देवता मेहरबान असेल तर एक रोमांचक सामना पाहता येईल.

राहुल त्रिपाठी आणि रजत पाटीदार यांच्यापैकी एकाला संधी

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी गेल्या IPL सिरीजमध्ये चांगली फलंदाजी करणारा मध्य प्रदेशचा युवा फलंदाज रजत पाटीदारला टीम इंडियाच्या प्लेइंग-11 मध्ये संधी मिळू शकते. मात्र, त्याला राहुल त्रिपाठीचे कडवे आव्हान आहे. या दोघांपैकी एकाला आजच्या सामन्यात संधी मिळू शकते.

दीपक चहर आणि श्रेयस अय्यरसाठी ऑडिशनची संधी

स्विंग गोलंदाज दीपक चहर टी-20 वर्ल्ड कपसाठी संघात नाही. तो स्टँडबाय मध्ये आहे. मात्र, जसप्रीत बुमराहच्या दुखापतीमुळे मात्र संघात एक जागा रिकामी झाली आहे. दुखापतीतून सावरल्यानंतर दीपक चहरने चांगले पुनरागमन केले आहे.

या सिरीजमध्ये दमदार कामगिरीच्या जोरावर तो ऑस्ट्रेलियाचे तिकीट मिळवण्याचा प्रयत्न करेल. त्याचप्रमाणे श्रेयस अय्यरचाही वर्ल्ड कपसाठी स्टँडबायमध्ये समावेश करण्यात आला आहे. या सिरीजमध्ये चांगली कामगिरी करून तो गरज पडल्यास मुख्य संघात स्थान मिळवण्याचा दावा करू शकतो.

दक्षिण आफ्रिकेसाठी सुपर लीगचे गुण खूप महत्त्वाचे आहेत

तुम्ही विचाराल की टीम इंडियाने या सिरीजसाठी ब संघ उतरवण्याचा निर्णय घेतला आहे, तर दक्षिण आफ्रिका त्यांच्या पूर्ण ताकदीच्या संघासह का उतरत आहे. तर त्याचे उत्तर आहे वर्ल्ड कप सुपर लीग पॉइंट्स. पुढील वर्षी वनडे वर्ल्ड कप भारतात होणार आहे.

भारत यजमान आहे त्यामुळे तो आधीच यासाठी पात्र झाला आहे. पण, जगभरातील उर्वरित संघ सुपर लीगच्या गुणांवरून ठरवले जाते. दक्षिण आफ्रिका सध्या 49 गुणांसह 11व्या क्रमांकावर आहे. यात सुधारणा करण्यासाठी तो या सिरीजमध्ये मजबूत संघासह उतरला आहे.

पिच रिपोर्ट

टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका या दोघांनीही या स्टेडियममध्ये आतापर्यंत एकही वनडे सामना खेळला नाही. येथे सर्वाधिक इंटरनॅशनल सामने अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्यात झाले आहेत. वनडेमध्ये पहिल्या डावात सरासरी 230 धावा झाल्या आहेत.

मात्र, यावेळी टीम इंडियाच्या खेळामुळे खेळपट्टीचा मूड वेगळा असू शकतो. टीम इंडियाने येथे दोन T20 इंटरनॅशनल सामने खेळले आहेत ज्यात त्यांनी 195 आणि 199 धावा केल्या आहेत. याचा विचार केला तर खेळपट्टी फलंदाजीला अनुकूल असू शकते.

12 वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेला भारतात हरवण्याचे आव्हान

टीम इंडियाने मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्धची शेवटची वनडे सिरीज 2010 मध्ये जिंकली होती. 2015 मध्ये भारतात झालेल्या सिरीजमध्ये आफ्रिकन संघाला यश मिळाले. म्हणजेच टीम इंडियासमोर 12 वर्षांनंतर आफ्रिकेविरुद्ध त्यांच्या घरी वनडे सिरीज जिंकण्याचे आव्हान असणार आहे.

बातम्या आणखी आहेत...