आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • 2023, 2025 WTC Finals To Be Played At Lord's ICC Board Selects Historic Ground For Both Title Matches

लॉर्ड्सवर खेळली जाणार 2023, 2025 ची WTC फायनल:ICC बोर्डाने दोन्ही विजेतेपदाच्या सामन्यांसाठी निवडले ऐतिहासिक मैदान

19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रिकेटचा मक्का म्हटल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दोन अंतिम सामने होणार आहे. 2023 आणि 2025 च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे अंतिम सामने येथे खेळवले जातील.

ICC बोर्डाने अंतिम ठिकाण म्हणून लॉर्ड्सची निवड केली आहे. जगातील क्रिकेटच्या प्रशासकीय समितीने मंगळवारी याची घोषणा केली.

ICC ने म्हटले आहे की, अनेक बाबी लक्षात घेऊन आम्ही क्रिकेटच्या शिखर स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे आयोजन करण्यासाठी लंडनमधील ऐतिहासिक क्रिकेटच्या मैदानाची निवड केली आहे.

विशेष म्हणजे WTC च्या पहिल्या सत्राच्या अंतिम फेरीसाठी लॉर्ड्सला पहिली पसंती होती. पण, हा कार्यक्रम तिथे होऊ शकला नाही.

न्यूझीलंडने पटकावले पहिले विजेतेपद

WTC च्या पहिल्या सत्राचा अंतिम सामना साउथॅम्प्टन येथील रोझ बाउल येथे झाला. त्या विजेतेपदाच्या सामन्यात भारताचा सामना न्यूझीलंडशी झाला आणि केन विल्यमसनच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंड संघाने अंतिम सामना जिंकून इतिहास रचला.

तारीख अजून जाहीर केलेली नाही

मात्र, पुढील वर्षी होणाऱ्या WTC अंतिम सामन्याच्या तारखा ICC ने जाहीर केल्या आहेत. लवकरच फ्युचर टूर प्रोग्रॅम म्हणजेच FTP रिलीज केला जाईल, ज्यामध्ये तो केव्हा आयोजित केला जाईल हे निश्चित केले जाईल.

बातम्या आणखी आहेत...