आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टी-20 वर्ल्डकप:ग्रुप-2 मध्ये भारतासह 3 सामने ; उपांत्य फेरीत कोण खेळणार? आज फैसला

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

टी-२० वर्ल्डकपचा आजचा सर्वात महत्त्वाचा दिवस आहे. कारण उपांत्य फेरीत कोण खेळणार याचा निर्णय व्हायचा आहे. ग्रुप-१ मधील न्यूझीलंड पहिल्या व इंग्लंड दुसऱ्या स्थानासह उपांत्य फेरीत पोहोचले. ग्रुप-२ मध्ये आज ३ सामने आहेत, जाणून घ्या संपूर्ण समीकरण...

दक्षिण आफ्रिका हरल्यास बाहेर व भारताचा उपांत्यमध्ये प्रवेश निश्चित द. आफ्रिका नेदरलँड्स : पहाटे ५:३० वा. द. आफ्रिका ४ सामन्यांत ५ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. नेदरलँड्सला हरवताच ७ गुण होतील. म्हणजे उपांत्यची जागा पक्की. मात्र, नेदरलँड्स जिंकला तर भारताचा उपांत्य फेरीत थेट प्रवेश निश्चित होईल.

पाक वा बांगलादेशपैकी जो जिंकेल त्याच्याच अपेक्षा कायम राहतील पाकिस्तान बांगलादेश : सकाळी ९:३० वा. दोन्ही संघांचे ४-४ सामन्यांत ४-४ गुण आहेत. जो संघ पराभूत होईल, त्याच्या अपेक्षा संपुष्टात. जिंकणारा संघ भारताचा पराभव अन् नेट रनरेटच्या भरवशावर राहील.

भारताला जिंकावेच लागेल, अन्यथा फायनलचा प्रवास कठीण भारत झिम्बाब्वे : दु. १:३० वाजता टीम इंडिया ग्रुप-२ मध्ये ४ सामन्यांसह ६ गुण घेऊन टॉपवर आहे. झिम्बाब्वेला हरवताच ८ गुण घेत उपांत्य फेरीत पोहोचेल. मात्र, हरल्यास नेट रनरेटचाच आधार असेल. चांगली गोष्ट म्हणजे उर्वरित तीन संघ शर्यतीत कुठे आहेत, याची स्थिती भारताच्या सामन्यापूर्वीच स्पष्ट झालेली असेल.

बातम्या आणखी आहेत...