आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • 3 Miracles Behind Sri Lankas Victory । Asia Cup 2022 Updates । Half Out For 58, But Then A Strong Comeback

3 चमत्कारांनी श्रीलंका बनला चॅम्पियन:58 धावांवर निम्मा संघ गारद, पण नंतर जोरदार पुनरागमन; दुबईचा इतिहासही खोटा ठरवला

लेखक: विक्रम सिंह23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीलंकेने पाकिस्तानचा 23 धावांनी पराभव करत आशिया कप 2022 चे विजेतेपद पटकावले. 1984 मध्ये प्रथमच या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 38 वर्षांत श्रीलंका संघ चॅम्पियन होण्याची ही सहावी वेळ आहे. यावेळी स्पर्धेच्या सुरुवातीला श्रीलंका हा सर्वात कमकुवत संघ मानला जात होता. तरीही यानंतर भारताच्या दक्षिणेकडील शेजाऱ्यांनी पुनरागमन करून इतिहासाच्या पानांवर सुवर्ण अक्षरात नोंद केली आणि संपूर्ण क्रिकेट जगताला थक्क केले.

श्रीलंकेच्या क्रिकेटपटूंनी आपल्या देशातील आर्थिक आणि राजकीय संकटाच्या काळात ज्या उत्साहाने जेतेपद पटकावले ते चमत्कारापेक्षा कमी नाही. चमत्कारदेखील एक, दोन नव्हे तर तीन घडले. एकेक करून सर्वांबद्दल जाणून घेऊया.

1. अफगाणिस्तानकडून हरले तेव्हा वाटले की, पहिल्या फेरीतूनच बाहेर पडतील

श्रीलंकेसाठी या आशिया चषकाची सुरुवात ही संकटापेक्षा कमी नव्हती. पहिल्याच सामन्यात त्यांचा नवशिक्या अफगाणिस्तानकडून पराभव झाला.

असे मानले जात होते की, ते बांगलादेशकडूनही हरू शकतात आणि पहिल्या फेरीतच स्पर्धेतून बाहेर पडतील, परंतु यावेळी श्रीलंकेच्या खेळाडूंनी आश्चर्यकारक कामगिरी करत पुनरागमन केले. प्रथम बांगलादेशचा पराभव करून सुपर-4 मध्ये स्थान मिळवले. यानंतर अव्वल स्थानावर राहताना अफगाणिस्तान, भारत आणि पाकिस्तानला पराभूत करून अंतिम फेरीसाठी पात्र ठरले.

अफगाणिस्तानकडून पराभूत झाल्यानंतर श्रीलंकेचा संघ पॅव्हेलियनमध्ये गेला, या पराभवानंतर त्यांनी शानदार पुनरागमन केले.
अफगाणिस्तानकडून पराभूत झाल्यानंतर श्रीलंकेचा संघ पॅव्हेलियनमध्ये गेला, या पराभवानंतर त्यांनी शानदार पुनरागमन केले.

2. अंतिम फेरीत 100 धावांच्या आत ऑलआऊट होण्याचा धोका

पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर श्रीलंकेला प्रथम फलंदाजी करावी लागली. पहिल्याच षटकात सलामीवीर कुशल मेंडिसच्या फलंदाजीत सर्वात वाईट गोष्ट घडली. तेव्हा संघाची धावसंख्या अवघ्या दोन धावांवर होती.

23 धावांच्या स्कोअरवर दुसरी विकेट, तर 36 रन्सच्या स्कोअरवर तिसरी विकेट पडली. त्यानंतर चौथी आणि पाचवी विकेटही काही क्षणांतच पडली. 9 षटके पूर्ण व्हायची होती आणि धावफलकावर फक्त 58 धावा होत्या. 100 धावांच्या आत ऑलआऊट होण्याचा धोका संघावर होता. यानंतर भानुका राजपक्षे (45 चेंडूंत 71 धावा) आणि वानिंदू हसरंगा (21 चेंडूंत 36 धावा) यांनी दमदार फलंदाजी करत संघाचे पुनरागमन केले. श्रीलंकेच्या संघाने 20 षटकांत 6 गडी गमावून 170 धावा केल्या. अंतिम सामन्यासारख्या तणावाच्या सामन्यात प्रतिस्पर्ध्यांना दडपणाखाली ठेवणारी धावसंख्या होती. अखेर तसेच घडले.

3. दुबईचा ट्रॅक रेकॉर्ड बदलला

दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर गेल्या T20 विश्वचषकापासून या आशिया चषकापर्यंत एकूण 13 सामने अव्वल-9 संघांमध्ये झाले आणि दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या संघाने सर्व जिंकले. त्यामुळे श्रीलंकेची 170 धावसंख्या पाकिस्तानसाठी सोपी वाटत होती. अखेर ट्रॅक रेकॉर्ड तसा एकतर्फी होता, पण इथून श्रीलंकेने तिसरा मोठा चमत्कार करून पाकिस्तानच्या धावा रोखून धरल्या. पाकिस्तानचा संघ 147 धावांवर रोखला गेला. श्रीलंकेने आशिया कप जिंकला. आता सर्वाधिक वेळा आशिया कप जिंकण्याच्या बाबतीत श्रीलंकेचा संघ भारतापेक्षा फक्त एक पाऊल मागे आहे. पुढील ग्राफिक्समध्ये कोणत्या संघाने किती विजेतेपदे जिंकली ते पाहा.

बातम्या आणखी आहेत...