आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • 326 Runs In An Innings; Cornwall's Unbeaten Double Century In 73 Balls, Atlanta Fire Beat The Square By 172 Runs

अमेरिका टी-20:एका डावात 326 धावा; 73 चेंडूंत काॅर्नवालचे नाबाद द्विशतक , अटलांटा फायरची 172 धावांनी स्क्वेअरवर मात

अटलांटा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विंडीजच्या स्फाेटक फलंदाज रहकिम काॅर्नवालने अमेरिका टी-२० लीगमध्ये धावांचा पाऊस पाडला. त्याने अटलांटा फायर संघाकडून झंझावाती खेळी करताना स्क्वेअर ड्राइव्हविरुद्ध नाबाद द्विशतक झळकावले. त्याने २६६.२३ च्या स्ट्राइक रेटने ७७ चेंडूंत १७ चाैकार आणि २२ षटकारांच्या आधारे नाबाद २०५ धावा काढल्या. याच द्विशतकाच्या बळावर अटलांटा फायर संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात एका गड्याच्या माेबदल्यात ३२६ धावा काढल्या.

प्रत्युत्तरात स्क्वेअर ड्राइव्ह संघाला निर्धारित षटकांत ८ गडी गमावत १५४ धावांपर्यंत मजल मारता आली. संघाकडून यशवंत बालाजीने ३८ आणि साई मंथाने ३६ धावांची खेळी केली. यासह अटलांटा फायर संघाने १७२ धावांनी दणदणीत विजयाची नाेंद केली. फायर संघाकडून गाेलंदाज जस्टिल डिलने सर्वाधिक ४ बळी घेतले. नाबाद द्विशतक साजरे करणारा काॅर्नवाल हा सामनावीर ठरला. फायर संघाकडून स्टीव्हन टेलरने ५३ आणि समीने नाबाद ५३ धावांची खेळी केली.

बातम्या आणखी आहेत...