आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी आयसीसी विविध प्रयत्न करत आहे. यंदा ९ ते १६ फेब्रुवारी २०२३ मध्ये दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या महिला टी-२० विश्वचषकच्या पात्रता स्पर्धेत ७७ संघ सहभागी होतील. स्पर्धेत ८ देशांचे संघ प्रथमच आयसीसी स्पर्धेत खेळतील. यात फ्रान्स, तुर्की, कॅमरून, भूतान, बोट्सवाना, मलावी, म्यानमार व फिलिपाइन्सचा समावेश आहे. यंदा ऑस्ट्रेलियात झालेल्या महिला टी-२० च्या अंतिम सामना पाहण्यासाठी ८६ हजार चाहत्यांनी मेलबर्नमध्ये हजेरी लावली होती. नव्या आठ देशांसह अर्जेंटिना व ब्राझीलला २०१२ नंतर प्रथमच पात्रतेमध्ये संधी मिळू शकते. यंदा ३७ संघांदरम्यान एकूण ११५ सामने खेळवले जातील. ऑगस्ट २०२१ पासून पात्रतेचे सामने सुरू होतील आणि २०२२ पर्यंत चालतील. यावेळी स्पर्धेत १० संघ वाढवण्यात आले.
यंदा थायलंड संघ टी-२० विश्वचषकात खेळल्यानंतर अनेक देश महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी पुढे आले. विशेष म्हणजे, ब्राझील पहिला देश बनला, ज्याने पुरुष संघापूर्वी महिला संघासोबत मुख्य करार केला. क्रिकेट ब्राझीलचे विस्तार अधिकारी मॅट फेदरस्टोन यांनी म्हटले की, देशात क्रिकेटच्या विकासात महिलांचे मोठे योगदान आहे. मुख्य करार केल्यानंतर देशातील क्रिकेटमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. आम्हाला महिती आहे, महिला संघात क्षमता आहे आणि त्यांना केवळ संधी देण्याची आवश्यकता आहे.
१० संघ उतरणार स्पर्धेत, दोन संघांना पात्रतेची संधी
यजमान आणि क्रमवारीतील अव्वल-७ संघांना विश्वचषकात थेट प्रवेश मिळेल. अखेरच्या दोन जागेसाठी पात्रता स्पर्धेत घेतली जाईल. एकूण १० संघांना संधी मिळेल. युरोप विभागातील पात्रता सामने ६ ऐवजी १५ व आफ्रिका विभागातील १७ ऐवजी २८ सामने होतील. अमेरिकन विभागातील सामन्यांची संख्या वाढवून ३ ऐवजी १२ केली आहे. अर्जेंटिना संघाचे मुख्य प्रशिक्षक सियान केली यांनी म्हटले की, नव्या संघांना चांगली संधी मिळत आहे. आमच्याकडे उत्कृष्ट खेळाडू आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.