आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिसरी कसाेटी/ तिसरा दिवस:इंग्लंडच्या पहिल्या डावात 432 धावा, पुजाराचे आशियाबाहेर वेगवान अर्धशतक; 12 डावांनंतर 50+

लीड्स2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्णधार रुटच्या शतकी खेळीच्या आधारे यजमान इंग्लंड क्रिकेट संघाने शुक्रवारी भारतविरुद्ध तिसऱ्या कसाेटीच्या पहिल्या डावात ४३२ धावांचा डाेंगर रचला. यासह इंग्लंडने ३५४ धावांची मजबूत अशी आघाडी घेतली. प्रत्युत्तरात भारतीय संघाने दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसअखेर २ गड्यांच्या माेबदल्यात २१५ धावा काढल्या. टीम इंडियाकडून सलामीवीर राेहित शर्मा (५९) आणि चेतेश्वर पुजाराने शानदार अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे आता भारतीय संघाची मदार फलंदाजांवर आहे. १३९ धावांनी पिछाडीवर असलेल्या भारतीय संघाचा पुजारा (नाबाद ९१) आणि कर्णधार विराट काेहली (४५) मैदानावर कायम आहेत. पुजाराने आशिया खंडाबाहेर वेगवान अर्धशतक साजरे केले. त्यामुळे आता टीमला या दाेघांकडून माेठ्या खेळीची आशा आहे. यासाठी राेहित शर्माने दमदार सुरुवात करुन दिली. त्याला इंग्लंडच्या राॅबिन्सनने राेखले. तत्पुर्वी लाेकेश राहुलने सलामीवीर राेहितसाेबत ३४ धावांची भागीदारी करून पॅव्हेलियन गाठले. त्याला आठ धावांची खेळी करता आली.

पुजाराच्या ९१ चेंडूंत ५० धावा; ३० वे अर्धशतक
सुमार खेळीतून सावरत आता चेतेश्वर पुजाराने दमदार पुनरागमन करताना लक्षवेधी अर्धशतक झळकावले. त्याने आशिया खंडाबाहेर वेगवान अर्धशतकाची नाेंद केली. त्याने ९१ चेंडूंमध्ये नऊ चाैकारांसह ५० धावा काढल्या. यासह त्याने वेगवान अर्धशतकी खेळीची नाेंद आपल्या नावे केली. यादरम्यान त्याने १२ डावानंतर कसाेटीत अर्धशतक साजरे करण्याचा पराक्रम गाजवला. यातून त्याला ३० वे कसाेटी अर्धशतक साजरे करता आले. त्याने फेब्रुवारी महिन्यात चेन्नईत इंग्लंडविरुद्ध अर्धशतक झळकावले हाेते.

राहुल अपयशी : सलामीवीर लाेकेश राहुल हा सलग तिसऱ्या डावात अपयशी ठरला. सलामी कसाेटीच्या पहिल्या डावातील शतकानंतर त्याने ५, ०, ८ धावा काढल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...