आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासलगच्या दाेन पराभवांतून सावरलेल्या पाहुण्या ऑस्ट्रेलिया संघाने आता बाॅर्डर-गावसकर ट्राॅफीमध्ये भारताविरुद्ध तिसऱ्या कसाेटीत विजयाचा दावा मजबूत केला आहे. ऑस्ट्रेलियन गाेलंदाजांनी इंदूरच्या हाेळकर स्टेडियमवर सर्वाेत्तम खेळीतून यजमान टीम इंडियाचा सलग दाेन्ही डावांत खुर्दा पाडला. त्यामुळे दुसऱ्या डावात दाणादाण उडालेल्या भारताला १६३ धावा काढता आला. यातून ऑस्ट्रेलिया संघाला आता विजयासाठी अवघ्या ७६ धावांचे टार्गेट मिळाले आहे. त्यामुळे ७० % सामना हा ऑस्ट्रेलिया संघाच्या बाजूने असल्याचे िदसते.
स्पिनर नॅथन लियाेन हा ऑस्ट्रेलियन गाेलंदाज यजमान टीम इंडियासाठी दुसऱ्या डावात डाेकेदुखी ठरला. त्याने फिरकीच्या सर्वाेत्तम खेळीतून आठ बळी घेत भारतीय संघाची दमछाक केली. त्याच्या याच खेळीच्या बळावर आता ऑस्ट्रेलिया तिसऱ्या कसाेटीत तिसऱ्याच दिवशी माेठा विजय साजरा करण्यासाठी सज्ज झाला आहे.
नॅथन दुसऱ्यांदा अडचणीचा : टीम इंडियासाठी घरच्या मैदानावर फिरकीपटू नॅथन लियाेन हा दुसऱ्यांदा अडचणीचा ठरला. त्याने डावात भारताविरुद्ध ८ बळी घेतले. त्याने ही कामगिरी यापूर्वी २०१७ मध्ये बंगळुरू कसाेटीदरम्यानही केली हाेती. आता पाच वर्षांनंतर याच कामगिरीला उजाळा दिला आहे.
पहिल्या डावात ११ धावांसाठी ऑस्ट्रेलियाने गमावल्या ६ विकेट पहिला डाव १०९ धावांवर गुंडाळणाऱ्या भारताने दुसऱ्या दिवशी दमदार सुरुवात करताना ऑस्ट्रेलियाला अडचणीत आणले हाेते. ऑस्ट्रेलिया संघाने कालच्या ४ बाद १५६ धावांवरून खेळण्यास सुरुवात केली. यादरम्यान हँड्सकाॅम्ब (१९) हा १८६ धावसंख्येवर बाद झाला. त्यापाठाेपाठ ऑस्ट्रेलियन फलंदाज पाठाेपाठ बाद झाले. यातून ११ धावांत ऑस्ट्रेलियाने ६ विकेट गमावल्या. यामुळे ऑस्ट्रेलियाची कसाेटीत तळातील फलंदाजांची ही आतापर्यंतची सर्वात सुमार कामगिरी ठरली.
पुजाराचे ३५ वे अर्धशतक; विराट काेहलीही ठरला फ्लाॅप यजमान भारतीय संघाला दुसऱ्या डावातही समाधानकारक कामगिरी करता आली नाही. यातून भारताची आघाडीची फळी सपशेल अपयशी ठरली. यातून कर्णधार राेहित शर्मासह (१२), शुभमन गिल (५), माजी कर्णधार विराट काेहली (१३) आणि ऑलराउंडर रवींद्र जडेजा (७) हे फ्लाॅप ठरले. यादरम्यान एकमेव चेतेश्वर पुजाराने एकाकी झुंज देत संघाच्या धावसंख्येला गती दिली. त्याने ५९ धावांची खेळी केली. यासह त्याने संयमी खेळीतून ३५ व्या कसाेटी अर्धशतकाची नाेंद केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.