आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंग्लंडला विजयासाठी 55 धावांची गरज:पाकविरुद्ध इंग्लंडला विजयी हॅटट्रिकची संधी

कराचीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बेन स्टाेक्सच्या नेतृत्वाखाली फाॅर्मात असलेल्या इंग्लंड संघाला आता दाैऱ्यावर यजमान पाकिस्तानविरुद्ध कसाेटी मालिकेत विजयी हॅट््ट्रिक साजरी करण्याची संधी आहे. यासाठी इंग्लंड संघाला फक्त ५५ धावांची गरज आहे. पाकिस्तान संघाने दुसऱ्या डावात २१६ धावा काढल्या. यासह यजमान संघाने इंग्लंडसमाेेर विजयासाठी १६७ धावांचे टार्गेट ठेवले हाेते. प्रत्युत्तरामध्ये इंग्लंड संघाने तिसऱ्या कसाेटीच्या दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसअखेर साेमवारी दाेन गड्यांच्या माेबदल्यात ११२ धावा काढल्या. सलामीवीर क्राऊली (४१) आणि बेन डकेटने (नाबाद ५०) दमदार सुरुवात करून देताना संघाला ८७ धावांच्या भागीदारीची सलामी दिली. दरम्यान, अर्धशतकाच्या वाटेवर असलेल्या क्राऊलीला पाकच्या गाेलंदाज अबरारने राेखले. त्यापाठाेपाठ रेहान अहमद १० धावांवर बाद झाला. आता कर्णधार बेन स्टाेक्स (१०) आणि सलामीवीर बेन डकेट (५०) मैदानावर कायम आहेत. पाक संघाकडून दुसऱ्या डावात दिवसअखेर गाेलंदाज अबरार अहमद यशस्वी ठरला. त्याने ६ षटकांत ४३ धावा देताना २ विकेट घेतल्या. इंग्लंड संघाने सलगच्या दाेन कसाेटी सामन्यांत विजय संपादन केला. यासह इंग्लंड संघाने तीन कसाेटी सामन्यांच्या मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली आहे.

बातम्या आणखी आहेत...