आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंदाचा टी-20 विश्वचषकाचा ट्रेंड:प्रत्येक 20 धावांनंतर एक बळी, सलामीवीरचा स्ट्राइक रेट सर्वात कमी

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ऑस्ट्रेलियात सुरू असलेला टी-२० विश्वचषक चाहते आतापर्यंतचा सर्वात रोमांचक विश्वचषक मानत आहेत. स्पर्धेत धक्कादायक निकाल लागत आहेत. ३५ सामन्यानंतर आकड्यांचा विचार केल्यास यंदा विश्वचषकात गोलंदाजांनी गत विश्वचषकापेक्षा अधिक यश मिळाले आहे. अनेक सामने अखेरच्या चेंडू किंवा अखेरच्या षटकांत समाप्त झाले आहेत.

वेगवान गोलंदाजांनी दिल्या कमी धावा गोलंदाज प्रत्येक २०, ४० चेंडूवर बळी घेत आहेत व त्यांच्या विरुद्ध रनरेट ७.३० असा आहे. यापूर्वी जेवढे विश्वचषक झाले, त्यामध्ये गोलंदजांना प्रत्येक बळीसाठी २१ पेक्षा अधिक धावा दिल्या आहेत.

पाॅवरप्लेमध्ये प्रति षटक रनरेट सर्वात कमी ६.६४ पाॅवरप्लेमध्ये गोलंदाजांनी मात्र २०.२३ च्या सरासरीने बळी घेतले आणि रनरेट ६.६४ चा राहिला. २०१६ मध्ये भारतात झालेल्या विश्वचषकात सरासरी २९.०७ आणि रन रेट ७.४३ पर्यंत होता.

सलामीवीर २१.९४ च्या सरासरीने धावा करू शकले सलामीच्या दृष्टीनेही ही स्पर्धा सर्वात कठीण ठरली आहे. सलामीवीर २१.९४ च्या सरासरीने धावा करू शकले आहेत जे मागील स्पर्धेतील सर्वात कमी आहे. त्याचा स्ट्राइक रेटही सर्वात कमी ११५.७ राहिला.

{नाणेफेक जिंकून फारसा परिणाम नाही २८ पैकी १६ सामने प्रथम खेळणारे जिंकले. गतवर्षी प्रथम खेळणाऱ्यांनी ४५ पैकी २९ सामने गमावले

{क्षेत्ररक्षण अवघड, ६२ झेल सोडले संघांनी ३१ सामन्यांमध्ये ६२ झेल सोडले व २४५ झेल घेतले. गेल्या वर्षी स्पर्धेत ४९ झेल सुटले.

बातम्या आणखी आहेत...