आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Aaron Finch Retires From ODIs । Poor Batting Performance, Will Remain Australia's T20 Captain For Now । Cricket Australia, T 20 World Cup

एरॉन फिंचची वनडेतून निवृत्ती:ऑस्ट्रेलियाच्या टी-20 कर्णधारपदी राहणार, न्यूझीलंडविरुद्ध खेळणार अखेरचा सामना

23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑस्ट्रेलियाचा वनडे आणि टी-20 कर्णधार अॅरॉन फिंचने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. रविवारी न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेनंतर तो या फॉरमॅटला अलविदा करणार आहे. फिंचच्या निवृत्तीचे कारण वनडेतील खराब कामगिरी असल्याचे मानले जात आहे. मात्र, तो टी-20 मध्ये कर्णधारपद सांभाळणार आहे. फिंचला यंदाच्या टी-20 विश्वचषकासाठी कर्णधारपदही सोपवण्यात आले आहे. फिंचच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने गेल्या वर्षी टी-20 विश्वचषक जिंकला होता.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंच हा वनडे आणि टी-20 फॉरमॅटमध्ये धावा काढण्यासाठी सतत संघर्ष करत आहे. एरॉन फिंचची बॅट बराच काळापासून शांत आहे.

विश्वचषक 2022 नंतर टी-20 तूनही निवृत्तीची शक्यता

ऑस्ट्रेलिया सध्या टी-20 विश्वचषकाचा चॅम्पियन आहे. यंदा कांगारू संघ आपल्या विजेतेपदाचे रक्षण करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. ऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच टी-20 विश्वचषकाचे आयोजन करत आहे. टी- 20 विश्वचषक 16 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. वास्तविक, असे मानले जात आहे की 2022 च्या टी-20 विश्वचषकानंतर एरॉन फिंचदेखील टी-20 फॉरमॅटला अलविदा करेल. एरॉन फिंच 35 वर्षांचा आहे, त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलिया या फॉरमॅटमध्ये युवा खेळाडूला संधी देऊ इच्छित.

अशी आहे फिंचची कारकीर्द

अलीकडेच एरॉन फिंचने असे संकेत दिले होते की, तो त्यांच्या 11 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीला अलविदा म्हणू शकतो. एरॉन फिंचने आपल्या कारकिर्दीत 5 कसोटी सामने खेळले आहेत, मात्र या फलंदाजाची ओळख नेहमीच पांढऱ्या चेंडूचा विशेषज्ञ म्हणून केली जाते. याशिवाय एरॉन फिंचने ऑस्ट्रेलियाकडून 145 वनडे आणि 92 टी-20 सामने खेळले आहेत. एरॉन फिंचने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 5401 धावा केल्या आहेत, तर टी-20 क्रिकेटमध्ये या खेळाडूने 92 सामन्यांमध्ये 2855 धावा केल्या आहेत. टी-20 फॉरमॅटमध्ये एरॉन फिंचने 17 अर्धशतकांसह दोनदा शतकाचा टप्पा ओलांडला आहे.

बातम्या आणखी आहेत...