आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्रिकेट:डिव्हिलर्सच्या मते कोहली हा फेडरर, तर स्मिथ हा नदालसारखा!

जोहान्सबर्गएका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • विराट सचिनपेक्षा सर्वाेत्तम; त्याच्यापुढे आव्हाने कठीण नाही

दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू डिव्हिलर्सने भारतीय कर्णधार विराट कोहलीची तुलना स्वित्झर्लंडचा टेनिस स्टार रॉजर फेडररशी आणि स्टीव्ह स्मिथची तुलना स्पॅनिश टेनिस स्टार राफेल नदालशी केली. इन्स्टाग्रामवर लाइव्ह चॅटदरम्यान डिव्हिलर्सने म्हटले, कोहलीने संपूर्ण जगात धावा काढल्या आहेत, दुसरीकडे स्मिथ मानसिक स्थितीत मजबूत आहे.  डिव्हिलर्स व कोहली आयपीएल संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळतात. त्याने म्हटले की, ‘कोहली नैसर्गिक बॉल स्ट्रायकर आहे. तेही फेडररसारखे. स्मिथबाबत बोलायचे झाले तर तो एकदम नदालसारखा आहे. 

स्मिथ मानसिकदृष्ट्या खूप मजबूत आहे. तो धावा करण्याचा पर्याय शोधून काढतो. त्याचा खेळ नैसर्गिक वाटत नाही. तो विक्रम मोडण्याची क्षमता ठेवतो. कोहलीने जगभरात धावा काढल्या आहेत.’  सचिन तेंडुलकर आमच्या दोघांचा आदर्श आहेे, असेही ताे म्हणाला.

बातम्या आणखी आहेत...