आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिनेश कार्तिकने IPL 2022 मध्ये RCB साठी केलेल्या शानदार कामिगिरीने चाहत्यांची मने जिंकली. त्यानंतर तो भारतीय टी-20 संघातही परतला. मात्र, गौतम गंभीर त्याला T20 WC साठी संघात योग्य मानत नाही.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 5 सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी दिनेश कार्तिकचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे, पण तो 2022 च्या T20 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाला जाणार की नाही? यावर चर्चा मात्र सुरूच आहे. IPL 2022 मध्ये RCB) साठी शानदार कामगिरी केल्यानंतर त्याला भारतीय T20 संघात परतण्याची संधी मिळाली.
सध्याच्या T20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात दिनेश कार्तिकने 21 चेंडूत 30 धावांची नाबाद खेळी खेळली. असे असूनही भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरला असे वाटते की दिनेश कार्तिक टी-20 विश्वचषक 2022 संघाचा भाग बनू शकणार नाही.
स्टार स्पोर्ट्सच्या मॅच पॉइंट्स शोमध्ये दिनेश कार्तिकच्या 30 धावांच्या खेळीबद्दल गंभीर म्हणाला, 'ही खूप शानदार खेळी होती. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून तो RCB साठी हे करत होता. विशेष म्हणजे तो फलंदाजीसाठी अक्षर पटेलच्या आधी आला असता तर मला अधिक आवडले असते.
जेव्हा गंभीरला T20 विश्वचषक 2022 साठी संघात दिनेश कार्तिकच्या निवडीबद्दल विचारण्यात आले, तेव्हा गंभीरने सांगितले की दिनेशसाठी हे सोपे नाही.
गंभीर म्हणाला, 'यावर आता काहीही बोलणे घाईचे ठरेल. T20 विश्वचषक अजून दूर आहे. तोपर्यंत त्याला चांगली कामगिरी करावी लागेल. पण त्याला शेवटच्या तीन षटकांतच फलंदाजी करायची असेल, तर परिस्थिती खूप कठीण होईल. कारण भारताला अव्वल-7 मध्ये असा खेळाडू नक्कीच हवा असेल जो फलंदाजासोबत चांगली गोलंदाजीही करू शकेल आणि अशा परिस्थितीत अक्षर पटेल हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.
गंभीर पुढे म्हणाला की, अशा स्थितीत मी दिनेश कार्तिकला T20 विश्वचषक मध्ये पाहात नाही. माझ्याकडे ऋषभ पंत आणि दीपक हुड्डासारखे खेळाडू असतील, एवढेच नाही तर संघात केएल राहुल, सूर्यकुमार यादव, विराट कोहली, रोहित शर्मा हे खेळाडू असतील.
एकदा हे खेळाडू परतले की, दिनेश कार्तिकला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवणे कठीण होईल. त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही तर त्याला संघात समाविष्ट करण्यात काहीच अर्थ नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.