आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासलामीच्या पराभवातून सावरलेल्या यजमान पाकिस्तान संघाने घरच्या मैदानावरील दुसऱ्या कसाेटीत इंग्लंड टीमचा माेठ्या खेळीचा प्रयत्न हाणुन पाडला. यजमान पाकच्या युवा फिरकीपटू अबरार अहमदने (७/१४४) शानदार गाेलंदाजी करत इंग्लंडला पहिल्या डावात झटपट गुंडाळले. त्याने पदार्पणात सात बळी घेतले. यामुळे इंग्लंडला पहिला डाव २८१ धावांवर गुंडाळावा लागला. इंग्लंडने पहिल्या सत्रात ५ बाद १८० धावसंख्येतून विक्रमाची नाेंद केली. टीमने आपलाच १७४ धावांचा विक्रम ब्रेक केला आहे. प्रत्युत्तरात यजमान पाक संघाने पहिल्या दिवसअखेर शुुक्रवारी २ बाद १०७ धावा काढल्या. बाबर आझम (६१) आणि शकील अहमद (३२) मैदानावर कायम आहेत. अँडरसन व लीचने प्रत्येकी एक बळी घेतला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.