आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआयपीएलच्या धर्तीवर दुबईत टी-20 लीग खेळवली जाणार आहे. लवकरच अमिरात क्रिकेट बोर्ड (ECB) या लीगची घोषणा करू शकते. शाहरुख खान या लीगचा एक भाग असणार आहे. शाहरुखने यापूर्वीच आयपीएल आणि कॅरेबियन प्रीमियर लीग (सीपीएल) मध्ये संघ खरेदी केला आहे. हा त्याचा तिसरा क्रिकेट संघ असेल. शाहरुखचे UAE मध्ये मोठ्या संख्येने चाहते आहेत. यामुळे तो या लीगमध्येही गुंतवणूक करणार आहे.
क्रिकबझच्या माहितीनुसार या स्पर्धेत 6 संघ सहभागी होणार आहेत. मुंबई इंडियन्सचे मालक मुकेश अंबानी, दिल्ली कॅपिटल्सचे अध्यक्ष किरण कुमार गांधी, मँचेस्टर युनायटेड आणि कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडचे संस्थापक राजेश शर्मा लीगसाठी संघ खरेदी करणार आहेत.
ईसीबीचा अदानी समूहासोबतचा करारही जवळपास निश्चित झाला आहे. या लीगला ICC कडूनही मान्यता मिळाली असून या स्पर्धेला UAE T20 लीग असे नाव देण्यात आले आहे.
अदानी समूह तयार
अमीरात क्रिकेट बोर्ड आणि अदानी समूहाच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांमधील चर्चा अंतिम टप्प्यात असून पुढील आठवड्यापर्यंत संघाची घोषणा होऊ शकते. ईसीबीने थेट गौतम अदानी यांच्याशी चर्चा केली आहे. सहाव्या संघासाठी राजस्थान रॉयल्स, सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्जसह अनेक संघांची आयपीएलशी चर्चा सुरू होती. इंग्लंडमधील लँकेशायर काउंटी क्रिकेट क्लब तसेच बिग बॅश लीगमधील सिडनी सिक्सर्स यांच्यात चर्चा सुरू होती, परंतु आता अदानी समूह हा संघ विकत घेण्याच्या तयारीत आहे.
जून-जुलैमध्ये सुरू होऊ शकते लीग
ईसीबीला जून-जुलैमध्ये लीग सुरू करायची आहे. यूएईमध्ये स्थानिक खेळाडूंची कमतरता आहे. त्यामुळे ही स्पर्धा मोठ्या प्रमाणावर परदेशी खेळाडूंवर अवलंबून असेल. साखळीचे सर्व सामने रात्री खेळवले जातील. अमीरात बोर्डाने 120 मिलियन डॉलर्ससाठी 10 वर्षांसाठी स्पर्धेचे मीडिया हक्क आधीच विकले आहेत.
क्रिकेटच्या मैदानातही मँचेस्टर युनायटेड
इंग्लिश फुटबॉल क्लब मँचेस्टर युनायटेडचे मालक ग्लेझर कुटुंबही या लीगमध्ये संघ खरेदी करणार आहे. यापूर्वी, ग्लेझर कुटुंबाने दोन आयपीएल संघांच्या लिलावातही भाग घेतला होता, परंतु त्यांना संघ खरेदी करण्यात यश आले नव्हते. यावेळी आयपीएलमध्ये 8 ऐवजी 10 संघ खेळणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.