आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Adidas, Puma Company Eager For Kit Sponsor; The Board Is Getting Rs 170 Crore From Nike, Earning Rs 2 Crore In 5 Years

क्रिकेट:किट प्रायोजकासाठी अदिदास, प्युमा कंपनी उत्सुक; नाइकीकडून मंडळाला 170 कोटी रुपये मिळत हाेते, 5 वर्षांत 2 कोटींची कमाई

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • लढतीची किंमत 88 लाखांवरून कमी करून 61 लाख

जर्मनीची कंपनी प्युमा भारतीय क्रिकेट संघाची किट प्रायोजक होऊ शकते. या शर्यतीत अदिदासदेखील आहे. सध्याचे प्रायोजक नाइकी दुसऱ्यांदा बोली लावणार की नाही यावर अद्याप निर्णय झाला नाही. नाइकीने २०१६ ते २०२० साठी ३७० कोटींसह अधिक ३० कोटी रुपये रॉयल्टी दिली होती. बीसीसीसीआयने नवीन निविदेमध्ये प्रत्येक सामन्याची मूळ किंमत ८८ लाख रुपयांवरून कमी करत ६१ लाख केली. म्हणजे मंडळाने स्वत: सामन्यासाठी २७ लाखांची कपात केली.

मंडळाच्या एका अधिकाऱ्याने म्हटले की, ‘प्युमाने निविदा अर्ज खरेदी केले आहेत. याचा अर्थ ते बोली लावतील असे नाही.’ अदिदास प्रायोजकांची बोली उतरेल की नाही हे अद्याप अधिकृत पुढे आले नाही. माहितीनुसार, जर्मनी कंपनी मर्चेंडाइज प्रॉडक्टसाठी बोली लावू शकते. त्यासाठी वेगळी निविदा असेल. उत्पादनाची विक्री कंपनीचे किती स्टोअर आहेत त्यावर निर्भर करते. प्युमाचे ३५० व अदिदासचे ४५० पेक्षा अधिक आऊटलेट आहेत. तज्ज्ञांनी म्हटले की, ‘एखाद्या नवीन कंपनीने ५ वर्षांसाठी जवळपास २०० कोटींमध्ये हक्क विकत घेतल्यास आश्चर्य वाटणार नाही. मंडळाने यापूर्वी नाइकीचा प्रस्ताव नाकारला आहे. याचा अर्थ त्यांना रस नाही किंवा कमी रकमेची बोली लावणार असेल.’

मंडळाने फ्रँचायझींना म्हटले : राज्य संघटनेला कमाईतील २० % द्यावे

मंडळाने आयपीएल फ्रँचायझींना म्हटले की, उत्पन्नाच्या २० टक्के राज्य संघटनेला द्यावे. मात्र, मंडळाने फ्रँचायझींना कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई देण्यास मनाई केली आहे. यंदा यूएईमध्ये स्पर्धा होणार आहे. अशात राज्य संघटनेला काही मिळणार नाही. यापूर्वी प्रत्येक सामन्याच्या आयोजनासाठी संघटनेला मंडळ व फ्रँचायझी दोघांकडून ५०-५० लाख रुपये मिळत होते. म्हणजे ८ सामन्यांचे ८ कोटी रुपये. खेळाडूंचा निधी आणि एकूण खर्च जाऊन प्रत्येक फ्रँचायझीला जवळपास १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई होते. कारण गेल्या १३ वर्षांत प्रत्येक स्पर्धेत असे होताना दिसते.

बातम्या आणखी आहेत...