आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Afghanistan Team Has A Chance Of A Winning Hat trick In The Asia Cup, Afghanistan Sri Lanka Match Today

आशिया चषक:अफगाणिस्तान संघाला आशियाचषकात विजयी हॅट््ट्रिकची संधी, अफगाणिस्तान-श्रीलंका सामना आज

शारजाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुपर ४ च्या पहिल्या सामन्यात भिडणार दोन्ही संघ

आशिया चषकासाठी शनिवारपासून सुपर-४ चा प्रारंभ होत आहे. सुपर-४ च्या पहिल्या सामन्यात पाच वेळची चॅम्पियन श्रीलंकेचा सामना अफगाणिस्तानसोबत होईल. अफगाणिस्तानचा संघ दुसऱ्यांदा सुपर-४ मध्ये पोहोचला आहे. संघाने यापूर्वी २०१८ मध्येही स्थान मिळवले होते. या वेळी अफगाणिस्तानचे खेळाडू चांगली कामगिरी करत असून संघाने ग्रुप राउंडचे दोन्ही सामने जिंकले आहेत.

अफगाणिस्तानने ग्रुप राउंडच्या पहिल्या सामन्यात श्रीलंकेला ८ विकेट्सनी, तर दुसऱ्यात दोन वेळच्या रनरअप बांगलादेशला ७ विकेट्सनी हरवले होते. या संघाला स्पर्धेत विजयाची हॅट््ट्रिक करण्याची संधी आहे. श्रीलंकेविरुद्ध सामन्यात अफगाणिस्तानच्या फजलहक फारुकीने तीन महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या होत्या, तर मुजीब उर रहमान आणि कर्णधार मोहंमद नबीने दोन-दोन बळी घेतले होते. मागील १० सामन्यांत श्रीलंकेच्या शनाकाने १५५.११ च्या स्ट्राइक रेटने २७३ आणि पथुम निसंकाने ११२ च्या स्ट्राइक रेटने २२४ धावा केल्या. अफगाणिस्तानच्या नजीबुल्लाहने १६०.५८ च्या स्ट्राइक रेटने २७३ आणि हजरतुल्लाहने २०० धावा केल्या. गोलंदाजीत अफगाणिस्तानचे पारडे चांगलेच जड आहे.

बातम्या आणखी आहेत...