आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Afridi Called Babar Rizwan Selfish: Jokingly Wrote In Post Match Could Have Been Won In 15 Overs, Both Took Till Last Over

आफ्रिदीने बाबर-रिझवानला ​​​​​​​म्हटले स्वार्थी:टाकली विनोदी पोस्ट, 15 षटकांत जिंकता आली असती मॅच, दोघांनी शेवटच्या षटकापर्यंत नेली

4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांच्या भागीदारीवर विनोदी वक्तव्य केलं आहे. 22 वर्षीय गोलंदाजाने बाबर आणि रिझवानला स्वार्थी फलंदाज म्हटले आहे.

एवढेच नाही तर आफ्रिदीने दोन्ही सलामीवीरांवर जाणीवपूर्वक संथ फलंदाजी केल्याचा आरोपही केला आहे. मात्र, त्याने हे सर्व विनोदी सुरात सांगितले आहे.

या तरुण गोलंदाजाने गुरुवारी रात्री एका सोशल पोस्टमध्ये लिहिले- 'मला वाटते कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानपासून मुक्त होण्याची वेळ आली आहे. दोघेही मोठे स्वार्थी खेळाडू आहेत.

जर सामना गंभीरतेने खेळले असते तर सामना 15 षटकांत संपला असता. पण, त्यांनी तो शेवटच्या षटकापर्यंत नेला. त्यामुळे या दोघांचा निषेध केला पाहिजे, मी म्हणतो ते बरोबर आहे ना.’'

मात्र, शाहीनने विनोदी स्वरूपात लिहिलेल्या पोस्टच्या शेवटच्या ओळीत असे लिहिले - 'या शानदार पाकिस्तानी टीमवर मला अभिमान आहे.' सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या या पोस्टवर चाहत्यांकडून विविध कमेंट्सचा पाऊस सुरू झाला आहे.

बाबर-रिझवानची रेकॉर्ड भागीदारी

पाकिस्तानी कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान या सलामीच्या जोडीने रेकॉर्ड भागीदारी केली आहे. या दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी 117 चेंडूत 203 धावा केल्या आहेत.

इंटरनॅशनल टी-20 मध्ये धावसंख्येचा पाठलाग करताना ही सर्वात मोठी भागीदारी आहे. या दोघांनीही आपले स्वता:चेच रेकॉर्ड मोडले आहेत. जी या दोघांनी गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केली होती.

पाकिस्तानने हा सामना 10 विकेटने जिंकला

हा सामना पाकिस्तानने 10 विकेटने जिंकला. त्यांनी 7 टी-20 सामन्यांच्या सिरिजमध्ये 1-1 अशी बरोबरी साधली आहे. इंग्लंडने 199/5 धावा केल्या होत्या. मोईन अलीने सर्वाधिक नाबाद 55 धावा केल्या.तर टीम पाकिस्तानने लक्ष्याचा पाठलाग करत 19.3 षटकांतच 203 धावा करत विजय मिळवला. पाकिस्तानकडून कर्णधार बाबर आझमने 110 आणि मोहम्मद रिझवानने 88 धावा केल्या.

आफ्रिदी सध्या टीम पाकचा भाग नाही

डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी अद्याप संघाचा भाग नाही. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात तो जखमी झाला होता. त्याला झालेल्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे तो आशिया कपपासून दूर होता. आशिया कप मध्ये अंतिम सामन्यात पाकचा श्रीलंकेकडून पराभव झाला होता.

बातम्या आणखी आहेत...