आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

क्रिकेट:ब्रॉडनंतर वेगवान गोलंदाजांना कसोटीत 500 बळी आव्हानात्मक, खेळाडूंची टी-20 ला पसंती

लंडन3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 2015 विश्वचषकानंतर ब्रॉडने 66 कसोटी खेळल्या, वनडे फक्त 2

इंग्लंडच्या वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्राॅडने कसोटीत ४९९ बळी घेतले आहेत. तो ५०० बळी घेणारा जगात चौथा वेगवान गोलंदाज बनेल. मात्र, त्याच्यानंतर कोणत्याही कसोटी वेगवान गोलंदाजाला ५०० बळींचा टप्पा गाठणे कठीण राहील. आज टी-२० सामन्यांना अधिक पसंती दिली जात आहे. जगभरात टी-२० लीग देखील खेळवली जात आहे. येथे खेळाडूंची चांगली कमाई देखील होत आहे. ब्राॅडने केवळ कसोटीलाच प्राधान्य दिले. विश्वचषक २०१५ म्हणजे मार्च २०१५ नंतर ब्रॉडने ६६ कसोटी खेळल्या. तो वनडेतून निवृत्त झालेला नाही. मात्र, यादरम्यान त्याने केवळ २ वनडे खेळला. टी-२० ब्रॉडने अखेरचा सामना ब्रॉडने २०१४ मध्ये खेळला होता.

ब्रॉडनंतर भारताचा ईशांत : ब्राॅडनंतर सर्वाधिक बळी घेण्याच्या यादीत वेगवान गोलंदाज भारताचा ईशांत शर्माचे नाव आहे. ३१ वर्षीय ईशांतने १३ वर्षांच्या कसोटी करिअरमध्ये ९७ सामन्यांत २९७ बळी घेतले आहेत.