आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भारत व इंग्लंड यांच्यातील क्रिकेट मालिकेला ५ फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. मालिकेत ४ कसोटी, ३ एकदिवसीय आणि ५ टी-२० सामने खेळवले जातील. अखेरचा सामना २८ मार्च रोजी होईल. त्यानंतर ११ एप्रिलपासून आयपीएलला सुरुवात होत आहे. म्हणजे दोन्ही स्पर्धेतील अंतर १३ दिवस आहे. टी-२० लीगचा अंतिम सामना ६ जूनला होईल. भारतीय संघ वर्ल्ड कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत दाखल झाला तर त्यांना १८ जूनपासून लॉर्ड््सवर होणाऱ्या फायनलमध्ये खेळावे लागेल. खेळाडू फेब्रुवारी ते जून या पाच महिन्यांत प्रचंड व्यस्त असतील.
सर्व फ्रँचायझींच्या मैदानावर नाही हाेणार आयपीएल सामने
देशात कोरोनाचे रुग्ण सतत कमी होत आहेत आणि व्हॅक्सिनही आली आहे. बीसीसीआय खेळाडूंच्या व्हॅक्सिनविषयी भारत सरकारशी चर्चा करत आहे. मंडळ कुठल्याही प्रकारची जोखीम घेऊ इच्छित नाही. त्यामुळे आयपीएलचे सामने आठ ऐवजी ३ किंवा ४ ठिकाणी आयोजित केले जाऊ शकतात. कारण, धोका टाळता येईल. येथे जैव सुरक्षित वातावरण बनवले जाईल. मंडळाने टी-२० मुश्ताक अली ट्रॉफीचे केवळ सहा ठिकाणी सामने घेतले. लीग सुरू करण्याचा निर्णय आयपीएल गर्व्हनिंग काैन्सिलच्या बैठकीत घेतला जाईल. मात्र, ११ एप्रिलपासून स्पर्धेला सुरुवात होईल.
१३८ दिवसांपैकी ४७ दिवस मैदानावर; तिसऱ्या दिवशी लढत
येत्या पाच फेब्रुवारीपासून इंग्लंड विरुद्ध मालिकेला सुरुवात होत आहे आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना २२ जूनपासून सुरू होईल. एकूण १३८ दिवसांत खेळाडूंना ५ कसोटी, ३ वनडे, ५ टी-२० आणि आयपीएलचे १४ सामने खेळायचे आहेत. खेळाडू एकूण ४७ दिवस मैदानावर असतील. म्हणजे पुढील पाच महिने प्रत्येक तिसऱ्या दिवशी खेळाडू सामना खेळावा लागेल. गत दोन वर्षे म्हणजे १ जानेवारी २०१८ पासून संघाचा विचार केल्यास भारताने सर्वाधिक १३१ सामने खेळले. इंग्लंड (१२१) दुसऱ्या, ऑस्ट्रेलिया (११२) तिसऱ्या, वेस्ट इंडीज (११०) चौथ्या आणि पाकिस्तान (१०८) पाचव्या स्थानी आहे.
ऑस्ट्रेलियात ८ खेळाडू जखमी; कोहली-रोहितच्या सर्वाधिक मॅच
खेळाडूंना अति ताणापासून दूर ठेवण्याचे काम संघ व्यवस्थापनाचे आहे. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघाचे ८ खेळाडू जखमी झाले होते. त्यामुळे अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली. त्यानंतर आपल्या व्यग्र कार्यक्रमावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. १ जानेवारी २०१८ पासून भारताकडून सर्वाधिक सामने खेळणाऱ्या खेळाडूंचा विचार केल्यास कर्णधार विराट कोहली सर्वात पुढे आहे. त्याने १०३ सामने खेळले. रोहित शर्मा ९८ सामन्यांसह दुसऱ्या स्थानी आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे त्रस्त आहे. मात्र, तो ७१ सामन्यांसह पाचव्या स्थानी आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.