आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Akshar's Play In Vain, India's Defeat; Sri Lanka's Draw Sri Lanka Won By 16 Runs; Third Fight Tomorrow

अक्षरची खेळी व्यर्थ, भारताचा पराभव; श्रीलंकेची बराेबरी:श्रीलंका संघ 16  धावांनी विजयी; उद्या तिसरी लढत

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पाहुण्या श्रीलंका संघाने गुरुवारी निर्णायक दुसऱ्या टी-२० सामन्यामध्ये यजमान टीम इंडियाचा पराभव केला. श्रीलंका संघाने १६ धावांनी दुसरा सामना जिंकला. यासह श्रीलंका संघाला तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत १-१ ने बराेबरी साधता आली. आता मालिकेतील तिसरा शेवटचा निर्णायक सामना उद्या शनिवारी राजकाेटमध्ये हाेणार आहे. कर्णधार दासुन शनाका (नाबाद ५६) आणि सलामीवीर कुशल मेंडिसच्या (५२) अर्धशतकाच्या बळावर श्रीलंका संघाने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद २०६ धावा काढल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाला निर्धारित २० षटकांत ८ गड्यांच्या माेबदल्यात १९० धावांपर्यंत मजल मारता आली. भारताकडून सुर्यकुमार यादव (५१) आणि अक्षर पटेलने (६५) अर्धशतकी खेळी केली. मात्र, त्यांना टीमचा पराभव टाळता आला नाही. यादरम्यान अक्षर पटेलची अष्टपैलु खेळी व्यर्थ ठरली. त्याने दाेन बळी घेतले. तसेच अर्धशतकही साजरे केले. श्रीलंका संघाने भारतविरुद्ध तिसऱ्यांदा २००+ धावसंख्या उभी केली. यापुर्वी २००९ मध्ये ६ बाद २१५ व ७ बाद २०६ धावा काढल्या हाेत्या.

बातम्या आणखी आहेत...