आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Ali Khan To Become First American Cricketer To Play In Ipl 2020, KKR Offers Chance To Replace Injured Harry Garni

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयपीएल 2020:अली खान लीग खेळणारा पहिला अमेरिकन क्रिकेटपटू ठरणार, केकेआरने जखमी हॅरी गर्नीच्या जागी दिली संधी

दुबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वेगवान गोलंदाज अलीने नुकताच सीपीएलचा किताब जिंकला

अमेरिकन वेगवान गोलंदाज अली खान यंदा आयपीएलमध्ये खेळेल. तो लीगमध्ये खेळणारा अमेरिकेचा पहिला खेळाडू बनेल. मात्र, अद्याप गव्हर्निंग कौन्सिलच्या परवानगीची प्रतीक्षा आहे. त्याचा कोलकाता नाइट रायडर्सने जखमी गोलंदाज हॅरी गर्नीच्या जागी समावेश केला. मूळ पाकिस्तानी असलेल्या अली खानचे कुटुंब २००९ मध्ये अमेरिकेत आले. तेथे त्याने क्लब क्रिकेट सुरू केले. २०१६ मध्ये त्याला कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये (सीपीएल) खेळण्याची संधी मिळाली. त्याने पहिल्या चेंडूवर कुमार संगकाराला बाद केले. मात्र, त्यानंतर दुखापतीमुळे जवळपास २ वर्षे बाहेर राहिला.

त्याने अमेरिकेतील चौथ्या स्तरावरील सामने खेळले. २०१८ कॅनडा टी-२० लीग त्याच्या करिअरचा निर्णायक क्षण ठरला. हॉक्सकडून खेळताना त्याने ८ सामन्यांत १० बळी घेतले. त्यानंतर त्याने त्रिनबागो नाइट रायडर्सशी करार केला. त्याने १२ सामन्यांत १६ विकेट घेतल्या. अलीने सीपीएल २०२० मध्ये त्रिनबागो नाइट रायडर्सचे प्रतिनिधित्व केले व टीमने किताबदेखील जिंकला.

अलीला अंतिम ११ मध्ये स्थान मिळवणे कठीण

३६ टी-२० सामन्यात ३८ बळी घेतलेल्या अली खानसाठी आयपीएलच्या अंतिम ११ मध्ये स्थान मिळवणे कठीण आहे. संघात चार विदेशी खेळाडू खेळू शकतात. इयोन मॉर्गन, सुनील नरेन, आंद्रे रसेल व पॅट कमिन्स खेळण्याची शक्यता अधिक आहे. त्यासह टॉम बेंटन, क्रिस ग्रीन व लॉकी फर्ग्युसनसारखे विदेशी खेळाडू संघात आहेत.

रिकाम्या स्टेडियममध्ये स्क्रीनवर दिसतील चाहत्यांचे व्हिडिओ

आयपीएल विनाप्रेक्षक होणार आहे. फ्रँचायझीने रिकाम्या स्टेडियममध्ये चिअर लीडर्स व चाहत्यांची उपस्थिती दाखवण्यासाठी पूर्ण तयारी केली. फ्रँचायझी रिकाम्या स्टेडियममध्ये स्क्रीन लावेल, ज्यावर चाहत्यांचा जल्लोष व चिअर लीडर्सचे व्हिडिओ दाखवले जातील. एका फँचायझीने म्हटले, “स्टेडियम पूर्णपणे रिकामे राहतील. संघांनी चिअर लीडर्सचे व्हिडिओ पहिलेच रेकॉर्ड केले आहेत. हे व्हिडिओ चौकार, षटकार व विकेट गेल्यावर दाखवले जातील. काही संघांनी चाहत्यांचे छोटे-छोटे व्हिडिओ बनवले.’

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser