आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकतारमध्ये मेसीच्या अर्जेंटिना संघाने वर्ल्डकप जिंकून जगाच्या कानाकाेपऱ्यात पुन्हा एकदा फुटबाॅलला नवीन हवा मिळवून दिली. संघांना पाठबळ देण्यासाठी भारतीय क्रिकेटपटू सक्रिय हाेते. यादरम्यान क्रिकेटचे मैदान गाजवणारे काही फुटबाॅलपटूही चांगलेच चर्चेत आले. यात खास करून ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू एलिसा लक्षवेधी ठरते.
1. ज्योफ्रे हर्स्ट, देश : इंग्लंड
हर्स्टने हॅट््ट्रिकच्या बळावर इंग्लंड संघाला फिफा विश्वचषक मिळवून दिला हाेता. १९६२ मध्ये काउंटीमध्ये एसेक्ससाठी प्रथम श्रेणी खेळला.
2. एलिसा पेरी, देश : ऑस्ट्रेलिया
फुटबाॅल व क्रिकेटचा विश्वचषक खेळणारी एलिसा पेरी ही ऑस्ट्रेलियन पहिली महिला खेळाडू आहे. तिने वयाच्या १६ व्या वर्षी दाेन्ही राष्ट्रीय संघात पदार्पण केले हाेते. तिने महिलांच्या २०११ विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेत गाेलही केला.
3. रिचर्ड््स, देश : विंडीज
विंडीजचे व्हिव्हियन रिचर्ड््स १९७५ व १९७९ चा वर्ल्डकप खेळले. त्यांनी फुटबाॅलपटूचीही भूमिका बजावली. त्यांनी १९७४ मध्ये पात्रता फेरीत सहभाग घेतला.
4.कॉम्पटन, देश : इंग्लंड
इंग्लंड संघाच्या सर्वाेत्तम फलंदाजांपैकी एक अशी काॅम्पटनची आेळख हाेती. त्यांनी कसाेटीत ५० पेक्षा अधिक व प्रथम श्रेणीमध्ये शतकांचे शतक साजरे केले.
5. चार्ल्स, देश : इंग्लंड
{इंग्लंडच्या चार्ल्सने २६ कसाेटी व आयर्लंडविरुद्ध फुटबाॅल सामना खेळला आहे. १९०२ मध्ये एफए कप फायनलमध्येही ते साऊथम्पटनकडून खेळले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.