आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Analysis | Cricketers 1st Choice IPL & Other T20 League Virat Kohli IPL Play More Than International Cricket News Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी अॅनालिसिस:लीगला क्रिकेटपटूंची पसंती; विराटनेही खेळले आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आयपीएलनंतर क्रिकेटचे स्वरूप बदलले, खेळाडू सहभागी
  • कोविडमुळे खर्च वाढेल, संघटना आंतरराष्ट्रीय मालिका कमी करतील :

टी-२० लीग आल्यानंतर आता ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी धोकादायक बनले. क्रिकेट आता फुटबॉल व बास्केटबॉलप्रमाणे वाढत आहे, जेथे मोठे खेळाडू आता लीगला अधिक महत्त्व देताहेत. तसेच, मोठ्या स्पर्धेचे आकर्षण देखील वाढत आहे. भारतीय कर्णधार विराट कोहली बद्दल बोलायचे झाले तर, त्याने २०१० पासून आतापर्यंत ८२ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळले. यादरम्यान भारतीय संघाने १०९ सामने खेळले आहेत. दुसरीकडे, आयपीएलमध्ये कोहलीने २००८ पासून १७७ लढती खेळल्या. पहिले क्रिकेट द्विपक्षीय मालिकेवर निर्भर होती. मात्र, २००८ मध्ये आयपीएल आल्यापासून सर्व उलट झाले. बीसीसीआयला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जेवढे उत्पन्न मिळत होते, त्यापेक्षा दुप्पट उत्पन्न प्रत्येक वर्षी आयपीएलमधून मिळत आहे.

कोविडमुळे खर्च वाढेल, संघटना आंतरराष्ट्रीय मालिका कमी करतील :

कोरोना व्हायरसनंतर आंतरराष्ट्रीय मालिकेचा खर्च वाढेल. ठिकाणाला सुरक्षित बनवावे लागेल, चार्टर्ड फ्लाइट आणि संघांना क्वाॅरंटाइन करण्याचा समावेश आहे. अशात ठिकाणे कमी होतील. वेस्ट इंडीज क्रिकेट मंडळाचे प्रमुख जॉनी ग्रेव्हने म्हटले की, न्यूझीलंड दौऱ्यात आम्हाला तीन टी-२० आणि तीन वनडे खेळायचे आहेत. अशात वाढलेला खर्चामुळे ते शक्य नाही. दुसरीकडे क्लब लीगवर दबाव कमी असेल. त्यात विदेशी खेळाडू कमी असतात. कॅरेबियन प्रीमियर लीगने म्हटले की, विदेशी खेळाडू विना लीग आयोजनास तयार आहे.

कमिन्सला मंडळासाेबत करारातून ४.२५ काेटी; आयपीएलमधून मिळतात १५.१५ काेटी

आॅस्ट्रेलियाच्या वेगवान गाेलंदाज पॅट कमिन्सला आपल्या क्रिकेट मंडळासाेबतच्या केंद्रीय करारातून वर्षाकाठी ४ काेटी १७ लाख मिळतात. कसाेटीतील या नंबर वन गाेलंदाजाने २०१९ मध्ये सात आंतरराष्ट्रीय सामने खेळले हाेते. यासाठी त्याला जवळपास आठ लाखांचा फायदा झाला. अशात त्याची एकूण कमाई ही ४ काेटी २५ लाखांची झाली. दुसरीकडे त्याला आयपीएलमधून १५.१५ काेटींची कमाई करता येते. यासाठी त्याच्याशी काेलकाता संघाने हा करार केला आहे.

२०२३ पासून आयपीएल संघात वाढ; 

अशात अनेक देशांच्या उत्पन्नात घसरण क्रिकेटबद्दल बोलायचे झाले तर, भारत जगातील इतर मंडळांपेक्षा ताकदवान आहे. २०२३ पासून आयपीएलमध्ये संघांची संख्या वाढवण्यात येईल. अशात भारताचे इतर संघांसोबत होणारे सामने कमी होतील. त्यामुळे त्या देशांच्या उत्पन्नावर परिमाण होईल. अशात सर्व देश लीगचे आयोजन करून कमाई वाढवण्यासाठी तयारी करत आहेत. ते पाहून इंग्लिश मंडळ देखील दि हंड्रेड लीग सुरू करतोय. लीगने खेळाडूंना पैसे देखील दिले आहेत. दुसरीकडे, लीगचे सामने दररोज खेळवता येऊ शकतात. त्यामुळे चांगली मागणी असेल.

बातम्या आणखी आहेत...