आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

क्रिकेट:अँडरसन 600 बळी घेणारा पहिला वेगवान गाेलंदाज, यापूर्वी तीन फिरकीपटूंनी ही कामगिरी केली

साउदम्प्टनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • इंग्लंड-पाक लढत ड्रॉ, इंग्लंडने मालिका 1-0 ने जिंकली

जेम्स अँडरसन कसोटीत ६०० बळी घेणारा जगातील पहिला वेगवान गोलंदाज बनला आहे. पाकविरुद्ध तिसऱ्या कसोटीत अजहर अलीला बाद केल्यानंतर त्याने हे यश मिळवले. यापूर्वी तीन फिरकीपटूंनी ६०० पेक्षा अधिक विकेट घेतल्या. अँडरसनला हा विक्रम करण्यासाठी ३३ हजार ७१७ चेंडू टाकावे लागले. सर्वात कमी चेंडूंत ६०० बळी घेण्याच्या बाबतीत तो दुसऱ्या स्थानी पोहोचला. मुरलीधरनने (३३७११) सर्वात कमी चेंडूत ही कामगिरी केली. अखेरच्या दिवशी पहिली २ सत्रे पावसामुळे झाली नाहीत. अजहर अली ३१ धावांवर बाद झाला. बाबर आझम ६३ धावावर परतला. खेळ समाप्त होईपर्यंत संघाने ४ बाद १८७ धावा काढल्या. पाकने पहिल्या डावात २७३ आणि इंग्लंडने ५८३ धावा केल्या होत्या. इंग्लंडने मालिकेत १-०ने विजय मिळवला. इंग्लंड घरात ६ वर्षे व १२ मालिकेत अजेय अाहे. दोघांतील ३ सामन्यांची टी-२० मालिका २८ ऑगस्टपासून सुरू होईल.

कसोटीत श्रीलंकन मुरलीधरनचे ८०० बळी, अँडरसन चौथ्या स्थानी

खेळाडूसामनेबळी
मुरलीधरन133800
शेन वॉर्न145708
अनिल कुंबळे132619
जेम्स अँडरसन156600
0