आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • IND Vs AFG; Anushka Sharma On Virat Kohli's 71st International Hundred, Anushka Shared A Note After Her Husband's Century: Said I Am With You In Every Situation; Virat Scored A Century After 3 Years

पतीच्या शतकानंतर अनुष्काने शेअर केली नोट:म्हणाली- मी प्रत्येक परिस्थितीत तुझ्यासोबत; विराटने 3 वर्षांनंतर ठोकले शतक

25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुवारी आशिया चषकात भारत आणि अफगाणिस्तानचा सामना झाला. या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने नाबाद खेळी खेळत शतक झळकावले.

शतकाच्या आनंदात कोहलीने आनंदात सर्वप्रथम अंगठीचे चुंबन घेतले आणि बोलताना सांगितले की, माझी पत्नी अनुष्का कठीण प्रसंगात माझ्यासोबत होती. यानंतर विराटची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्माने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

मी सदैव तुझ्यासोबत आहे - अनुष्का

अनुष्काने तिच्या पोस्टमध्ये विराट कोहलीचे काही फोटो शेअर केले आहेत. कॅप्शनमध्ये तिने लिहिले की, मी प्रत्येक परिस्थितीत तुझ्यासोबत आहे. विराट कोहलीने या पोस्टवर कमेंटमध्ये हार्ट इमोजी पोस्ट केले आहे.

किंग कोहलीचे 2019 नंतरचे शतक

विराटने तब्बल तीन वर्षांनंतर (1020 दिवस) इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये शतक केले आहे. यापूर्वी, त्याने 23 नोव्हेंबर 2019 रोजी बांगलादेश विरुद्ध कोलकाता कसोटीत कारकिर्दीतील 70 वे शतक झळकावले होते. इंटरनॅशनल टी-20 मधील हे त्याचे पहिले शतक आहे.

सर्वाधिक इंटरनॅशनल शतके झळकावण्याच्या बाबतीत विराट कोहलीने आता ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगची बरोबरी केली आहे. दोघांच्या नावावर आता 71-71 शतके आहेत. सचिन तेंडुलकर 100 शतकांसह आघाडीवर आहे.

अनुष्का शर्माने तिच्या सोशल मीडिया पोस्टवर चित्रपटाच्या सेटवरील एक फोटो शेअर केला आहे.
अनुष्का शर्माने तिच्या सोशल मीडिया पोस्टवर चित्रपटाच्या सेटवरील एक फोटो शेअर केला आहे.

4 वर्षांच्या ब्रेकनंतर अनुष्का दिसणार मोठ्या पडद्यावर

अनुष्का तिच्या आगामी चित्रपटात क्रिकेट खेळताना दिसणार आहे. चकदा एक्सप्रेसमध्ये ती झुलन गोस्वामीच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाद्वारे ती तब्बल 4 वर्षांनंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. अनुष्का शेवटची 2018 मध्ये शाहरुख खानसोबत झिरो या चित्रपटात दिसली होती.

बातम्या आणखी आहेत...