आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सद्गुरुंच्या समर्थनात डिव्हिलियर्स:व्हिडियो मॅसेजमध्ये चाहत्यांना अवाहन - माती वाचवा मोहिमेत जग्गी वासुदेव यांचे समर्थन करा, मी त्यांचा मोठा भक्त

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

धर्मगुरु आणि पर्यावरणवादी सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी लंडनमधून आपली जर्नी'टू सेव सॉइल' (माती वाचवा मोहीम) सुरु केली आहे. याअंतर्गत ते 100 दिवसांच्या मोटरसायकल प्रवासाला निघाले आहेत. या काळात सद्गुरू 26 देश आणि 30 हजार किलोमीटरचा प्रवास करतील.

दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू एबी डिव्हिलियर्स सद्गुरूंच्या या मोहिमेला पाठिंबा देत आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत तो म्हणाला, 'तुम्हा सर्वांना माहीत आहे की मी सद्गुरूंचा महान भक्त आहे. पुन्हा एकदा ते आपल्या प्लॅनेटला सुरक्षित करण्यासाठी एक मोठे पाऊल उचलत आहे. आपली माती वाचवण्यासाठी ते मोटारसायकलवरून 26 देशांचा दौरा करत आहेत. कृपया या महान माणसाला साथ द्या.

लंडनमधील पार्लमेंट स्क्वेअर येथून या दौऱ्याला हिरवा झेंडा दाखवण्यात आला

मातीचे संवर्धन न केल्यामुळे निर्माण होणाऱ्या धोक्याबद्दल सद्गुरु जगाला सावध करत आहेत. सोमवारी लंडनमधील पार्लमेंट स्क्वेअरपासून त्यांच्या अभियानाला सुरुवात झाली. 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारताच्या कावेरी खोऱ्यात ही मोहीम संपेल.

एबी डिव्हिलियर्सचा सद्गुरूंसोबतचा व्हिडिओ 2020 मध्ये आला होता
2020 मध्ये, एबी डिव्हिलियर्सने ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. ज्यामध्ये तो सद्गुरुंना लॉटरीमध्ये कोणता नंबर घ्यावा असे विचारताना दिसला जेणेकरून तो लॉटरी जिंकू शकेल. या प्रश्नाच्या उत्तरात सद्गुरू म्हणाले होते की, मी तुम्हाला भाग्यवान क्रमांक देऊ शकतो, पण मी म्हणेन की तु मैदानात चौकार-षटकार मारत राहिलात तर तुझी लॉटरी आपोआप लागेल.

एबीला खूप प्रेम मिळते
या व्हिडिओमध्ये सद्गुरूंनी एबीला सांगितले की, तुला भारतात खूप प्रेम मिळते. याशिवाय एबीने आपल्या देशाच्या जुन्या इतिहासाबद्दलही प्रश्न विचारले होते आणि दक्षिण आफ्रिका आपला जुना वेदनादायक इतिहास विसरून पुढे कसे जाऊ शकते असा सवाल त्याने केला होता.

एबीच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, आपण आपला इतिहास बदलण्याचा प्रयत्न करू नये तर भविष्याचा विचार केला पाहिजे. एबी डिव्हिलियर्सने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. गेल्या सीझनपर्यंत तो RCB कडून आयपीएल खेळत होता.

बातम्या आणखी आहेत...