आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअर्शदीप सिंगला पहिला T-20 सामना खेळता आला नाही. मात्र तो दुसऱ्या टी-20 सामन्यासाठी परतला आणि त्याने सलग तीन नो बॉल टाकले. तसेच पुढच्या ओव्हर मध्येही त्याने दोन नो बॉल टाकले. त्याची ही खेळी पाहुन चाहते संतापले आणि त्यांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला.
अर्शदीपची ही खेळी पाहुन कर्णधार हार्दिक पंड्याही संतापला होता आणि त्याने त्याचे दोन्ही हातांनी तोंड लपवले..यावरून त्याचा आलेला राग आपणास सहजपणे दिसून येतो.
गुरुवारी पुण्यात खेळल्या गेलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या T-20 सामन्यात (IND vs SL) भारतीय क्रिकेट संघाच्या वेगवान गोलंदाजांची सुरुवात खराब झाली. श्रीलंकेसाठी कुशल मेंडिस आणि पाथुम निसांका यांनी पॉवरप्लेमध्ये 50 धावा करत भारतीय गोलंदाजांना अडचणीत आणले.
या सामन्यात भारतीय वेगवान गोलंदाजांनी बरेच नो बॉल टाकले. त्यामुळे काही फ्री हिट्स झाल्या.तर, अर्शदीप सिंगने दुसऱ्या षटकात जेव्हा सलग तीन नो बॉल टाकले आणि त्या षटकात त्याने 19 धावा दिल्या. यानंतर चाहते चांगलेच संतापले, त्यांनी त्यांचा राग सोशल मीडियावर दिसून आला
तत्पूर्वी, श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारताने संजू सॅमसन आणि हर्षल पटेलच्या जागी राहुल त्रिपाठी आणि अर्शदीप सिंगला आणून दोन बदल केले. तर श्रीलंकने पूर्वीच्याच संघाची पुनरावृत्ती करत मैदानात उतरला.
स्कोअर - श्रीलंका - 206/6
भारत - 190/8
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन: हार्दिक पंड्या (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, राहुल त्रिपाठी, दीपक हुडा, अक्षर पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, युझवेंद्र चहल आणि अर्शदीप सिंग
श्रीलंका प्लेइंग इलेव्हन: दासुन शनाका (क), पठुन निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), धनंजय डी सिल्वा, चरित अस्लांका, भानुका राजपक्षे, हसरंगा डी सिल्वा, चमिका करुणारत्ने, महेश थेक्षाना, कसून रजिथा, दिलशान मदुशंका
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.