आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आश्विनने अनिल कुंबळेचे दोन मोठे विक्रम मोडले:बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत मोठी कामगिरी केली; पहिल्या डावात घेतले सहा बळी

14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये भारतीय फिरकीपटू रविचंद्रन अश्विनची दमदार गोलंदाजी पुन्हा एकदा पाहायला मिळाली. त्याने मालिकेतील चौथ्या आणि शेवटच्या कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात एकूण 6 बळी घेतले. फलंदाजीला अनुकूल अहमदाबादच्या खेळपट्टीवर सर्व भारतीय गोलंदाज झुंजत असताना अश्विनने आपल्या अनुभवाच्या जोरावर कांगारू फलंदाजाला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या डावात सहा बळी घेऊन अश्विनने महान फिरकी गोलंदाज अनिल कुंबळेचे दोन मोठे विक्रम मोडीत काढले.

अश्विनला पहिल्या डावात टॉड मर्फीच्या रूपात पाचवी विकेट मिळाली. यासह त्याने अनिल कुंबळेचा बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये विकेट घेण्याचा विक्रम मोडला. कुंबळेच्या नावावर बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या 20 सामन्यांमध्ये एकूण 111 विकेटची नोंद आहे. आता अश्विनच्या नावावर बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये एकूण 113 विकेट्ची नोंद झाली. या ट्रॉफीच्या 22व्या सामन्यात त्याने ही कामगिरी केली आहे. यासह अश्विनने बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीतही पहिले स्थान गाठले. मात्र, ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लियॉनच्या नावावरही बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये 113 विकेट्सची नोंद आहे. मात्र त्याने यासाठी 26 सामने खेळले आहेत. तर अश्विनने 22 सामन्यांमध्ये तेवढ्याच विकेट्स घेतल्या आहेत.

अश्विनने यासह कुंबळेचा आणखी एक विक्रम मोडीत काढला आहे. घरच्या मैदानावर सर्वाधिक 5 विकेट घेण्याच्या बाबतीत त्याने कुंबळेला मागे टाकले आहे.

कुंबळेने घरच्या मैदानावर 25 वेळा 5 विकेट घेतल्या होत्या. अश्विनने 26 वेळा 5 विकेट्स घेतल्या. या यादीत अश्विन दुसऱ्या स्थानावर आहे. श्रीलंकेचा माजी फिरकीपटू रंगना हेराथनेही हा पराक्रम 26 वेळा केला आहे. या यादीत अग्रस्थानी श्रीलंकेचा महान फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरनचे नाव आहे. ज्याने श्रीलंकेत 45 वेळा 5 विकेट घेतल्या.

घरच्या मैदानावर सर्वाधिक 5 विकेट्स

1. मुथय्या मुरलीधरन - 73 सामन्यात 45 वेळा 5 विकेट्स 2. रंगना हेराथ - 49 सामन्यात 26 वेळा 5 विकेट्स 3. आर अश्विन - 56 सामन्यांमध्ये 26 वेळा 5 विकेट्स 4. अनिल कुंबळे - 53 सामन्यात 25 वेळा 5 विकेट्स

अश्विन-जडेजाने 10 वर्षांत भारतात 55 टक्के बळी घेतले

भारतीय उपखंडातील खेळपट्ट्या फिरकीपटूंना अनुकूल आहेत, पण आपले जडेजा आणि अश्विन ज्या प्रकारे घरच्या मैदानावर एकामागून एक विरोधी पक्षाला मात देत आहेत त्यामुळे ही फिरकी जोडी लवकरच जगातील महान गोलंदाज जोडी बनू शकते. ​​​​​​​येथे वाचा संपुर्ण बातमी.

बातम्या आणखी आहेत...