आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी मुलाखत - युजवेंद्र चहल:माझ्या यशात अश्विनचे मोठे योगदान, नव्या फ्रँचायझीकडून खेळताना दबाव, भागीदारीमध्ये गोलंदाजांना होतो फायदा- चहल

जयपूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजस्थान रॉयल्सचा लेग स्पिनर युजवेंद्र चहलने गत सामन्यात हैदराबादविरुद्ध ३ बळी घेत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले होते. राजस्थान संघात तो आणि आर. अश्विन जागतिक दर्जाची फिरकी जोडी आहे. भागीदारीत गोलंदाजी करणे फायदेशीर ठरते. त्यामुळे दोन्ही गोलंदाजांना बळी मिळतात. तो मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळला आहे. राजस्थान हा त्याचा आयपीएलमधील तिसरा संघ आहे. चहलशी झालेल्या संवादातील काही अंश...

*तू मुंबई, बंगळुरूकडून खेळला आहेस. आता राजस्थानकडून खेळतोयस. तिन्ही फ्रँचायझींच्या कल्चरमध्ये काय फरक आहे?
प्रत्येकाचे आपापले कल्चर असते. ८ वर्षे बंगळुरूमध्ये होतो, ३ वर्षे मुंबई इंडियन्सकडून खेळलो. आता राजस्थानमध्ये आहे. येथील वातावरण शांत आहे. सर्वजण साधारण व सहकार्य करणारे आहेत.

*देशासाठी खेळणे व फ्रँचायझीसाठी खेळण्यात उत्साहात काय फरक पडतो?
जेव्हा तुम्ही देशासाठी खेळता तेव्हा एक वेगळाच उत्साह संचारतो. तसेच फ्रँचायझीसाठी वेगळा असतो. मी आयपीएलमधून भारतीय संघाकडून खेळलो, मी भारतासाठी खेळो अथवा फ्रँचायझीसाठी, माझा नेहमी १०० टक्के योगदान देण्यावर भर असतो.

*तू बंगळुरूसाठी ११३ सामने खेळले आहेत, आताही बंगळुरूची आठवण येते का?
राजस्थानकडून पहिला सामना खूप चांगला ठरला. नव्या फ्रँचायझीकडून खेळत असल्याने थोडा दबाव होता. बंगळुरूसोबत ८ वर्षे संबंध राहिला, चाहत्यांची आठवण येते.

*युजी टीव्हीची कल्पना कोठून आली ?
तुम्हाला पत्रकारांपेक्षा चांगली मुलाखत घेताना पाहिले आहे. मी असाचा आहे. युजी (चहल) टीव्ही करण्यात मज्जा येते. तो एक छोटा प्रकार आहे. थोडे गमतीदार प्रश्न विचारले जातात. त्यामुळे चाहत्यांना कळते की, ड्रेसिंग रूममधील वातावरण कसे आहे.

*तू व अश्विनची जागतिक दर्जाची जोडी राजस्थानकडे आहे. त्याचा किती फायदा मिळतो?
अश्विनभाईसोबत गोलंदाजी करताना मला खूप मज्जा येते आहे. त्यांच्याकडे जी विविधता आहे, त्यातून मला खूप शिकायला मिळते. आम्ही दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर सोबत खेळलो आहोत. गत सामन्यात जे बळी घेतले, त्यात त्यांचे मोठे योगदान आहे. कारण त्यांनी दुसऱ्या बाजूने दबाव निर्माण केला होता. एका गोलंदाजाला भागीदारीत गोलंदाजी करणे खूप आवश्यक आहे. त्यामुळे त्यांना बळी मिळतो व आम्हालाही.

*पत्नी धनश्रीकडून तुला क्रिकेटसाठी किती पाठिंबा मिळतो? त्यांना क्रिकेट आवडते का?
धनश्रीने मला नेहमी पाठिंबा दिला आहे. विशेषकरून जेव्हा विश्वचषकासाठी माझी निवड झाली नव्हती. पुण्यातील सामन्यादरम्यान ती आपली शूटिंग समाप्त करत थेट पुण्यात दाखल झाली होती. दुसऱ्या दिवशी सकाळीच तिचे शूटिंग होते, तरीदेखील ती सामना पाहण्यास आली हाेती.

*तू चॅम्पियन संघाचा सदस्य आहेस. राजस्थान यंदा चॅम्पियन बनण्यासाठी योग्य आहे का?
मी मुंबई इंडियन्ससोबत चॅम्पियन (२०१३) बनलाे होतो. यंदा आमचा संघ खूप मजबूत आहे. फिरकी असो वा वेगवान आक्रमण किंवा फलंदाजांची फळी, आमच्याकडून मजबूत खेळाडू आहेत. आम्ही यंदा चॅम्पियन बनू अशी आशा आहे.

बातम्या आणखी आहेत...