आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Asia Cup 2022 Bangladesh VS Sri Lanka; Victory Celebration Of Sri Lanka, Kusal Mendis, Dasun Shanaka, Sri Lanka Avenges Nagin Dance After 4 Years: Bangladesh Defeats Sri Lankan Team In Nidahas Trophy 2018 Final

श्रीलंकेने 4 वर्षांनंतर घेतला नागीण डान्सचा बदला:2018 च्या निदाहास ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेचा बांग्लादेशने केला होता पराभव

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

UAE मध्ये आशिया कपचा थरार कायम आहे. सर्व टीम आपआपल्या क्षमतेने आपली शक्ती दाखवत आहेत. श्रीलंकेने शुक्रवारी बांग्लादेशवर 2 गडी राखून विजय मिळवला. या थरारक विजयानंतर श्रीलंकेचे खेळाडू नागीण डान्स करताना दिसले. ते बांग्लादेशी खेळाडूंना आणि त्यांच्या चाहत्यांना नागीण डान्स करून चिडवत होते.

खरं तर बांग्लादेशने पहिल्यादा फलंदाजी करत 20 षटकात 7 गडी गमावून 183 धावा केल्या होत्या आणि दुसऱ्या डावात श्रीलंकेच्या फलंदाजांना हे लक्ष्य गाठता येणार नाही असं चित्र होतं. त्यामुळे बांग्लादेशचे चाहते स्टेडियमच्या गॅलरीत नागीण डान्स करत श्रीलंकन खेळांडूना डिवचत होते. पण, शेवटी श्रीलंकेचा संघ जिंकला आणि त्यानंतर बांग्लादेशच्या चाहत्यांना उत्तरादाखल श्रीलंकन खेळाडूंनीही नागीण डान्स केले.

तूम्हाला आठवत असेल तर या घटनेची पुनरावृत्ती होत आहे ते म्हणजे चार वर्षांपूर्वी 2018 मध्ये बांग्लादेशने श्रीलंकेचा पराभव केला होता आणि श्रीलंकेला निदाहस ट्रॉफीतून बाहेर पडावे लागले होते. त्यावेळी बांग्लादेशच्या खेळाडूंनी नागीण डान्स केला होता. तेव्हा हा नागीण डान्स पहिल्यांदा प्रसिद्ध झाला होता.

सामनावीर कुशल मेंडिसने 60 धावा केल्या आणि 2 बळीही घेतले.
सामनावीर कुशल मेंडिसने 60 धावा केल्या आणि 2 बळीही घेतले.

बांग्लादेशकडून अफिफ हुसेनने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 22 चेंडूंत चार चौकार आणि दोन षटकार मारत 39 धावा काढल्या. मेहंदी हसनने मिराजने 38 धावा काढल्या. तर मोसाद्देक हुसेनने शेवटच्या षटकात दमदार फलंदाजी करत केवळ नऊ चेंडूत 24 धावा काढल्या.

श्रीलंकेकडून वानिंदू हसरंगा आणि चमिका करुणारत्ने यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले, तर श्रीलंकेसाठी कुशल मेंडिसने 37 चेंडूत 60 धावा तर कर्णधार दासुन शनाकाने 33 चेंडूत 45 धावा काढल्या.

सुपर-4 मध्ये 3 संघ, आज होणार चौथ्याचा निर्णय

सब्बीर रहमानची विकेट घेताना आसिथा फर्नांडिस.
सब्बीर रहमानची विकेट घेताना आसिथा फर्नांडिस.

या विजयासह आशिया कप स्पर्धेतील टॉप-4 संघांमध्ये 3 संघ अंतिम झाले आहेत. अफगाणिस्तान, भारत आणि श्रीलंका. त्याचबरोबर आजचा पाकिस्तान आणि हॉंगकॉग यांच्यातील सामना बाबर आझमच्या संघाने जिंकला तर तो चौथा संघ ठरेल.

बातम्या आणखी आहेत...