आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Asia Cup 2022 India Pakistan Probable Playing 11 Players List | Rohit Sharma Virat Kohli KL Rahul, India Vs Pakistan Tomorrow In Asia Cup: Know Both Teams' Possible Playing XI, Also Check All Players' T20 Record

आशिया चषकात आज भारत V/s पाकचा थरार:स्पर्धेत मागील 8 वर्षांपासून भारतच विजयी, जाणून घ्या दोन्ही संघांचे संभाव्य प्लेइंग-11

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

10 महिन्यांच्या दीर्घ कालावधीनंतर आज भारत आणि पाकिस्तानचे क्रिकेट संघ आमनेसामने येणार आहेत. आशिया चषक गट अ अंतर्गत होणारा हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल.

यापूर्वी, दोन्ही संघ 24 ऑक्टोबर 2021 रोजी याच मैदानावर टी-20 विश्वचषकात आमनेसामने आले होते. पाकिस्तानने हा सामना 10 विकेटने जिंकला होता. म्हणजेच पराभवाची परतफेड करण्याची संधी आज टीम इंडियाला आहे.

स्पर्धेत भारतच वरचढ

आशिया चषकाबद्दल बोलायचे तर पाकिस्तान संघाने 2014 पासून भारताविरुद्ध एकही सामना जिंकलेला नाही. 2018मधील आशिया चषक आणि 2016 मध्ये पाकिस्तान भारताकडून दोनदा पराभूत झाला होता. एकूणच आशिया चषक स्पर्धेबद्दल बोलायचे झाले तर भारताने पाकिस्तानविरुद्ध 14 पैकी 8 सामने जिंकले आहेत. पाकिस्तान संघाने 5 सामने जिंकले आहेत. पावसामुळे एक सामना रद्द करावा लागला होता.

आशिया चषकाची सुरुवात शनिवारी श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान सामन्याने झाली. परंतु बहुतांश क्रिकेट चाहत्यांसाठी स्पर्धेची खरी सुरुवात आज होणार आहे. कारण, आज एकमेकांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी असणाऱ्या भारत-पाकमध्ये सामना होणार आहे. स्पर्धेत दोन्ही संघ अनेकदा एकमेकांपुढे येणार असले तरी आजच्या पहिल्याच सामन्यामुळे प्रेक्षकांचा रोमांच शिगेला पोहोचणार आहे.

या आशिया चषक स्पर्धेमध्ये दोन्ही संघांकडून कोणत्या 11-11 खेळाडूंना संधी मिळू शकते ते जाणून घेऊया. यासोबतच टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये या खेळाडूंचा ट्रॅक रेकॉर्ड कसा आहे हे देखील तुम्हाला कळेल. फलंदाजीच्या क्रमानुसार आम्ही दोन्ही संघांचे प्लेइंग 11 समोरासमोर ठेवले आहेत.

सर्वप्रथम भारत आणि पाकिस्तान यांच्यातील प्लेइंग-11 काय असू शकते ते जाणून घेऊया...

बातम्या आणखी आहेत...