आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Asia Cup 2022, Rohit Sharma Virat Kohli Vs KL Rahul Struggle, KL Rahul Is A Problem For Team India, Runs Scored At A Strike Rate Of 90 In 2022, Possibility Of Kohli Rohit Duo As Openers

केएल राहुल टीम इंडियासाठी ठरतोय अडचण:2022 मध्ये 90च्या स्ट्राइक रेटने काढल्या धावा, सलामीवीर म्हणून कोहली-रोहित जोडी येणार?

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

2012 मध्ये युवराज सिंगची एक जाहिरात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती, त्यात तो म्हणतो ' 'जब तक बल्ला चल रहा है तब तक ठाठ है”, ….म्हणजे जोपर्यंत तूम्ही मैदान गाजवता तोपर्यंत तूम्हाला सगळेजण विचारतील , तूमची कदर करतील, सन्मान देतील…अन्यथा तूमचे जवळचे प्रियजन सुद्धा तूमच्यावर टीका करू लागतात' अशीच काहीशी स्थिती टीम इंडियाचा सलामीवीर केएल राहुलची आहे. कालपर्यंत ज्याला रोहित शर्माचा उत्तराधिकारी म्हणून पाहिल्या जात होते, आता मात्र परिस्थिती त्याच्या अगदी उलट आहे. त्याला संघातून वगळण्याची मागणी होत आहे.

दुखापतीनंतर वापसी करणारा कर्नाटकचा फलंदाज आशिया कपमध्ये आतापर्यंत फ्लॉप ठरला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात तो खातेही न उघडता तंबूत परतला. त्याच वेळी, हाँगकाँगसारख्या दुबळ्या संघाविरुद्ध केएल राहूल इतका संघर्ष करत होता की जणू समोर 80 च्या दशकातील वेस्ट इंडीज संघातील गोलंदाज करणारी टीम आहे.

टी-20 सामन्यात 39 चेंडू खेळून 36 धावा करणे म्हणजे चांगली फलंदाजी असे कोणीही म्हणणार नाही, त्याची ही संथगतीची फलंदाजी अजूनही भारतीय चाहत्यांच्या समजण्या पलीकडे आहे. दिव्य मराठीला त्याच्या या फलंदाजीची रणनीती जाणून घ्यायची होती आणि त्यामुळे टीमने BCCI च्या अधिकाऱ्याशी बोलायचा प्रय़त्न केला आहे. पाहू या ते काय म्हणतात.

विराटने 6 महिन्यांनंतर हाँगकाँगविरुद्ध अर्धशतक झळकावले. त्याच्या कामगिरीवर BCCI खूश आहे.
विराटने 6 महिन्यांनंतर हाँगकाँगविरुद्ध अर्धशतक झळकावले. त्याच्या कामगिरीवर BCCI खूश आहे.

कोहलीच्या फॉर्मवर आनंद झाला, मात्र टीम व्यवस्थापन राहुलला जास्त संधी देणार नाही

दिव्य मराठी रिपोर्टरने BCCI च्या सूत्रांशी संवाद साधला आणि त्यांना भारतीय संघाच्या टॉप-3 ऑर्डर बद्दल विचारले. यावर बोर्ड अधिकाऱ्याने सांगीतले, 'हाँगकाँगविरुद्ध कोहलीची फलंदाजी पाहून आम्हाला खूप आनंद झाला आहे. तो फॉर्ममध्ये परतल्याने टीमला खूप फायदा होणार आहे. मात्र यावेळी रोहित आणि राहुलचा फॉर्म अजूनही आमच्यासाठी चिंतेचा विषय बनला आहे. यावर टीम व्यवस्थापनामध्ये विचारमंथन सुरू आहे.

आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केएल राहुलला खातेही उघडता आले नाही.
आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केएल राहुलला खातेही उघडता आले नाही.

केएल राहूल नाही तर सलामीला कोण उतरणार?

आशिया कपनंतर टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 ची सीरीज खेळायची आहे. त्यानंतर टी-20 विश्वचषकही होणार आहे. अशा स्थितीत सलामीच्या खेळाडूची समस्यासुद्धा लवकरात लवकर सोडवाव्या लागतील. केएल राहुलचा स्ट्राइक रेट हा 2021 मध्ये 130 आणि 2022 मध्ये 90 होता.

त्याच वेळी, IPL मध्येही राहुलने 135 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. तर टीम इंडिाला टॉप-3 मध्ये अशा फलंदाजांची गरज आहे जो कमी चेंडू खेळून जास्त धावा करू शकेल, म्हणजे तो तडाखेबंद फलंदाजी करू शकेल.

रोहित शर्माला मागच्या काही सामन्यांमध्ये जास्त धावा काढता आल्या नाहीत मात्र तो मैदानावर येताच मोठे फटके मारण्याचा प्रयत्न नक्कीच करतो. रोहितने हाँगकाँगविरुद्ध 13 चेंडूत 21 धावा काढल्या होत्या, त्यामुळे भविष्यात विराट हा रोहित सोबत सलामीला येण्याची शक्यता नाकारता येत नाही. यात विराट स्थिर राहून मुख्य भूमिका निभावू शकतो आणि रोहितला मोठे शॉट्स खेळण्याची संधी देवू शकतो.

गेल्या सामन्यात कोहली फॉर्ममध्ये परतला आहे, त्यामुळे पुढच्या सामन्यात त्याचे नवे रूप पाहायला मिळू शकते. तसेच सूर्यकुमार जो यावेळी 177.52 च्या स्ट्राइक रेटने धावा करत आहे. त्यामुळे टीम इंडियात थोडा बहोत बदल झाल्यास, तो 3 क्रमांकावर येण्याची शक्यता आहे

काही बदल झाल्यास टीमला ऋषभ पंतसारख्या तगड्या फलंदाजाला सुद्धा खेळवता येऊ शकते. जो एकटाच कोणत्याही सामन्याचे पारडे फिरवू शकतो. दीपक हुडा हा देखील एक पर्याय असू शकतो जो फलंदाजीसोबतच गोलंदाजीतही चांगली कामगिरी करू शकतो.

सूर्यकुमार यादव क्रमांक 3 आणि कोहली सलामीला फलंदाजी करताना दिसू शकतात.
सूर्यकुमार यादव क्रमांक 3 आणि कोहली सलामीला फलंदाजी करताना दिसू शकतात.

केएल राहुलला वगळले तर टीम इंडियाचे प्लेइंग-11 असे होऊ शकते...

1. रोहित शर्मा, 2. विराट कोहली, 3. सूर्यकुमार यादव, 4. ऋषभ पंत, 5. हार्दिक पंड्या, 6. दिनेश कार्तिक, 7. रवींद्र जडेजा, 8. भुवनेश्वर कुमार, 9. अर्शदीप सिंग, 10. आवेश खान, 11. युजवेंद्र चहल

बातम्या आणखी आहेत...