आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Asia Cup 2022, We Want Son To Take Babar Azam's Wicket: Arshdeep Singh's Parents Tell Divya Marathi Revenge For World Cup Loss To Pakistan

आमची इच्छा मुलाने बाबरची विकेट घ्यावी:अर्शदीपचे आई-वडील दिव्य मराठीला म्हणाले - वर्ल्डकप मध्ये झालेल्या पराभवाचा बदला घ्यावा

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत आणि पाकिस्तानचे क्रिकेट संघ जवळपास दहा महिन्यांनंतर आज आशिया कपमध्ये आमनेसामने येणार आहेत. भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर आहे.

त्याच्या अनुपस्थितीत पंजाबचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला संघात स्थान मिळाले आहे. अर्शदीपमध्येही फ्युचर स्टार दिसत आहे. त्याला लेफ्ट हॅण्डर बुमराह म्हणूनही ओळखले जाते.

अर्शदीपने आतापर्यंत 6 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, परंतु त्याचे पालक स्टेडियममध्ये जाऊन त्याला भारताकडून खेळताना पाहू शकले नाहीत. त्याला ही पोकळी भरून काढायची आहे आणि आपल्या मुलाला पाकिस्तानविरुद्ध भारताच्या प्लेइंग-11 मध्ये संधी मिळेल या आशेने ते दुबईला पोहोचले आहेत.

शनिवारी दुबईला रवाना होण्यापूर्वी अर्शदीपची आई बलजीत कौर आणि वडील दर्शन सिंह यांनी दिव्य मराठीशी खास बातचीत केली. यावेळी त्यांनी अर्शदीपचा आतापर्यंतचा प्रवास आणि आशिया चषक स्पर्धेतील त्याच्याशी संबंधित आशांबद्दल मोकळेपणाने बोलले. पाहूया त्या संवादातील काही अशं...

अर्शदीप सिंग त्याच्या कुटुंबासह.
अर्शदीप सिंग त्याच्या कुटुंबासह.

प्रश्न- तुम्ही दोघेही भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पाहण्यासाठी दुबईला जात आहात, अर्शदीपला कोणत्या पाकिस्तानी फलंदाजाची विकेट घेताना तुम्हाला पाहायचे आहे?

उत्तर- आई हसली आणि म्हणाली, खूप कठीण प्रश्न विचारला. हसणे थांबवत त्या म्हणाल्या - बाबर आझम. त्याचवेळी वडिलांनी सांगितले की, मुलासाठी आणि संघासाठी सर्व विकेट महत्त्वाच्या असतात, पण इतर भारतीयांप्रमाणे मलाही त्याने बाबरची विकेट घ्यावी असे वाटते. हे त्यांच्यासाठी एक प्रकारे बक्षीसच असेल. बाबर सध्या जगातील नंबर 1 फलंदाज आहे. त्याची विकेट संघासाठी खूप महत्त्वाची असेल.

प्रश्‍न- तुम्ही आजपर्यंत अर्शदीपचे किती सामने स्टेडियमवर पाहायला गेला आहात?

उत्तर- या वर्षी जूनमध्ये दक्षिण आफ्रिकेसोबतच्या टी-20 मालिकेसाठी अर्शदीपची टीम इंडियात निवड झाली होती. त्यानंतर आम्ही दोघे दिल्लीला पहिला T-20 सामना पाहायला गेलो. मात्र, त्यावेळी त्याला पदार्पणाची संधी मिळाली नाही.

जर त्याला पाकिस्तानविरुद्ध संधी मिळाली तर आपण त्याला स्टेडियममध्ये जाऊन पहिल्यांदा भारताकडून खेळताना पाहू.

प्रश्न- तुम्ही लोक अर्शदीपशी शेवटचे कधी बोललात, तो सामन्याबद्दल काही बोलला होता का?

उत्तर - आज (शनिवारी) दुपारीच त्याच्याशी बोलणे झाले. तो फक्त दुबईला येण्याबद्दल बोलला. कोणता पदार्थ घ्यायचा? हॉटेलमध्ये कसे जायचे, कॅब बुक कसे करायचे वगैरेबद्दल तो बोलत होता. सामन्याबाबत मात्र काहीही बोलणे झाले नाही. आम्हीही त्याबद्दल काहीही विचारले नाही.

तुम्हाला माहीत आहे की, अनेक सराव सत्रे सुरू आहेत आणि ते सर्व नेहमी सामन्याचाच विचार करत असतील. म्हणूनच आम्ही कुटुंबियांबद्दल आणि इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या, जेणेकरून मुलाचे मन ताजेतवाने होईल.

अर्शदीप सिंह त्याचा मोठा भाऊ आकाशदीपसोबत.
अर्शदीप सिंह त्याचा मोठा भाऊ आकाशदीपसोबत.

प्रश्न- या सामन्याबद्दल तुम्हाला काय आशा आहे?

उत्तर- आई बलजीत कौर म्हणाल्या की बघा, भारताने सामना जिंकावा, आणि तो दमदारपणे जिंकावा, अशी आमची इच्छा आहे. आशिया कप जिंकूनच भारताने परतावे.

त्याचवेळी वडील दर्शन सिंह म्हणाले की, टी-20 विश्वचषकात भारताचा पाकिस्तानकडून पराभव झाला होता. आता या सामन्यात भारताने त्या पराभवाचा बदला घ्यावा अशी माझी इच्छा आहे. मला आशा आहे की आम्ही नक्कीच जिंकू.

वेस्ट इंडिज दौऱ्यावरील सामन्यादरम्यान प्रेक्षकांसोबत अर्शदीप सिंग
वेस्ट इंडिज दौऱ्यावरील सामन्यादरम्यान प्रेक्षकांसोबत अर्शदीप सिंग

प्रश्न- अर्शदीप क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करू शकतो हे तुम्हाला कधी कळले?

उत्तर- मी स्वतः गोलंदाज होतो. आम्ही सरदार रविवारी केस धुतो आणि उन्हात वाळवतो. एकदा मी माझे केस कोरडे करत असताना मी अर्शदीपला इतर मुलांसोबत क्रिकेट खेळताना पाहिले. मी पाहिलं की तो खूप चांगल्या अॅक्शनने गोलंदाजी करत आहे. तर त्याच्या वयातील बहुतेक मुले थ्रो बॉलिंग करतात.

तेव्हा मला वाटले की अर्शदीप गोलंदाज होऊ शकेल. मी स्वतः क्रिकेट खेळायचो पण फार पुढे जाऊ शकलो नाही. त्यामुळे मला वाटले की अर्शदीप माझे स्वप्न पूर्ण करू शकतो आणि भारतासाठी खेळू शकतो. मग मी त्याला प्रशिक्षक जसवंत सिंग यांच्याकडे घेऊन गेलो. तेव्हापासून त्याने मागे वळून पाहिलेच नाही.

त्यापूर्वी तिन्ही भावंडे स्केटिंगचा सराव करायचे. अर्शदीपचा मोठा भाऊ फ्लोअर बॉल खेळायचा आणि शाळेनंतर नॅशनलपर्यंत पोहोचला. पण तुम्हाला माहिती आहे की भारतातील खेळांबाबत भविष्य फारसे सुरक्षित नाही. अशा स्थितीत प्रत्येकाला खेळाडू बनवणे शक्य नव्हते. मोठा मुलगा कॅनडाला गेला आणि मग आम्ही अर्शकडे पूर्ण लक्ष देऊ लागलो

बातम्या आणखी आहेत...