आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Asia Cup | First Loss Under Rohit, Pakistan Win By 5 Wickets, India's First Defeat In The Tournament In Eight Years

आशिया कप:पाकचा भारतावर 5 गडी राखून विजय, रोहितच्या नेतृत्वाखाली पहिला पराभव; स्पर्धेत भारत प्रथमच पराभूत

दुबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आशिया कप टी-२० क्रिकेट स्पर्धेत सुपर-4 सामन्यात पाकिस्तानने भारताचा ५ गडी राखून पराभव केला. स्पर्धेत भारत आठ वर्षांनंतर प्रथमच पराभूत झाला आहे. भारताने 181/7 धावा केल्या होत्या. पाकिस्तानने एक चेंडू शिल्लक ठेवून 5 गडी गमावून विजय मिळवला. 180+ अशी मोठी धावसंख्या गाठीशी असूनही रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ प्रथमच पराभूत झाला.

दीपक हुड्डा संघात असताना भारताचा हा पहिलाच पराभव आहे. यापूर्वी हुड्डा संघात असताना भारतीय संघाने १७ सामने जिंकले आहेत. भारत-पाकमध्ये दुबईत ३१६ दिवसांमध्ये ही तिसरी लढत होती. यापूर्वी गेल्या रविवारचा सामन्यात भारताने पाकिस्तानला 5 गडी राखून पराभूत केले होते.

रोहितचा विक्रम

पाकिस्ताने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण केले. रोहित आणि राहुल यांनी 5.1 षटकात 54 धावांची सलामी दिली. रोहित-राहुल या जोडीने टी-20 मध्ये 50+ भागीदारी करण्याची ही 14 वी वेळ होती. रोहितने 16 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनेे 28 धावा केल्या. प्रथम फलंदाजी करीत टी -20 सामन्यांमध्ये त्याचे 101 षटकार झाले आहेत. त्याने प्रथम फलंदाजी करीत सर्वाधिक षटकार ठोकण्याचा न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्टिलच्या विक्रमाशी बरोबरी केली. आशिया कपमध्ये भारताकडून सर्वाधिक 17 षटकार खेचणारा तो भारतीय कर्णधार ठरला आहे. रोहितचे कर्णधार म्हणून 100 षटकार झाले आहेत . त्याने 57 डावांमध्ये हा विक्रम केला. सर्वाधिक षटकार खेचणाऱ्या भारतीय कर्णधारांच्या यादीत तो चौथ्या स्थानी आहे. रोहितने कर्णधार म्हणून 2000 धावा पूर्ण केल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2000 पेक्षा अधिक धावा करणारा तो 10 भारतीय कर्णधार आहे.

गोलंदाजी चिंतेचा विषय होती, पाक विरुद्ध ती ठसठशीतपणे समोर आली
स्पर्धा सुरू झाली तेव्हाच भारतासाठी गोलंदाजी हा चिंतेचा विषय होता. त्यामुळे कामगिरीवर विपरीत परिणाम होईल का, असा प्रश्न होता. दुर्दैवाने पाकिस्तानविरुद्धच्या सुपर-4 सामन्यातच ही कमकुवत बाजू ठसठशीतपणे समोर आली. भारताने केवळ चार नियमित गोलंदाज आणि हार्दिक पंड्याचा उपयोग केला.याचा अर्थ कर्णधार रोहित शर्मा दबावाखालीच होता. कारण पाचवा गोलंदाज म्हणून हार्दिक पंड्या
महागडा ठरला. दुसरा प्रमुख गोलंदाज युजवेंद्र चहल यानेही 4 षटकात तब्बल 43 धावा पाकिस्तानी फलंदाजांना बहाल केल्या. त्याच्या गोलंदाजीवर पाकिस्तानी फलंदाजांनी बरेच चौकार खेचले. त्यामुळे भारतीय संघाने ठेवलेल्या दबावातून बाहेर पडणे पाकिस्तानी संघाला सोपे झाले. भारताकडे धारदार गोलंदाजीची वानवा आहे याची जाणीव पाकिस्तानला झाली होती. त्याचाच फायदा त्यांनी अचूक उचलला. तथापि, युवा लेगस्पिनर रवी बिश्नोईने उत्तम गोलंदाजी करीत दबाव कायम ठेवला, परंतु त्यानेही वाइड चेंडू बरेच टाकले. खुशदील क्रीझवर आला त्या वेळी दीपक हुड्डाला गोलंदाजी न देण्याचा निर्णय आश्चर्यकारक होता. एकूणच भारतीय संघाने संधी गमावली. रवींद्र जडेजाच्या
गैरहजेरीत अनुभवी ऑफस्पिनर आर.अश्विनचा संघात समावेश करणे गरजेचे आहे.

भारतीय संघाने या सामन्यासाठी केले ३ बदल

भारतीय टीमने या सामन्यात तीन बदल केले. यष्टिरक्षणाची जबाबदारी ऋषभ पंतने सांभाळली. दिनेश कार्तिकला संधी मिळाली नाही. याशिवाय हार्दिक पंड्याचा समावेश केला. हॉँगकाँगविरुद्धच्या सामन्यात पंड्या नव्हता. फिरकीपटू रवी बिश्नोईला प्रथमच संधी देण्यात आली. तसेच दीपक हुड्डालाही संघात स्थान देण्यात आले. ताप आल्याने आवेश खानला विश्रांती देण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...