आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Asia Cup ICC Trophy India Performance Analysis: Rohit Sharma, Rahul Dravid, Team India's Worst Run In 11 Years: We Are Not Champions Of Any Mega Tournament, Why Is It Difficult To Even Win The World Cup Now? Find Out…

टीम इंडियाचा 11 वर्षांतील सर्वात वाईट काळ:आपण कोणत्याही मेगा टूर्नामेंटचे चॅम्पियन नाही, वर्ल्डकप जिंकणे देखील कठीण? जाणून घ्या..

लेखक: आदर्श कुमार16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एखाद्या क्रिकेट टीमला संपूर्ण जगात नंबर वन होण्यासाठी कशाची आवश्यकता आहे - तर चांगले निवडकर्ते, चांगले खेळाडू, उत्तम सपोर्टिंग स्टाफ आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणारा कर्णधार. टीम इंडियाकडे हे सर्वकाही आहे, पण तरीही टीम इंडिया गेल्या 11 वर्षातील सर्वात वाईट टप्प्यामधून जाताना दिसत आहे.

2011 नंतर पहिल्यांदाच आम्ही कोणत्याही मोठ्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन नाही. ICC करंडक असो किंवा आशियाई क्रिकेट परिषदेचा (ACC) आशिया चषक असो, आमच्याकडे कोणतेही विजेतेपद नाही. पहिल्यांदा आपण खाली दिलेल्या ग्रफिक्स वरून समजून घेऊया की गेल्या 11 वर्षात आपण किमान एका मोठ्या स्पर्धेचे गतविजेते कसे होतो आणि यावेळी UAE येथे झालेल्या आशिया कपमध्ये आपण हा टायटलही गमावला आहे.

पुढे, आपण हे जाणून घेऊया की आगामी वर्ल्डकप आपल्याला जिंकणे कठीण का आहे

टीम इंडिया तब्बल 28 वर्षानंतर 2011 मध्ये वनडे वर्ल्ड कपमध्ये चॅम्पियन बनली होती. 2015 पर्यंत ही ट्रॉफी आमच्याकडे होती, पण नंतर 2015 मध्ये आम्ही तिचा बचाव करू शकलो नाही आणि ऑस्ट्रेलियन टीम चॅम्पियन झाली.

  • 2015 मध्ये विश्वविजेतेपद गमावण्यापूर्वी भारतीय संघाने 2013 मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. 2017 मध्ये आम्ही अंतिम फेरीत पोहोचलो आणि अंतिम सामना पाकिस्तानकडून हरलो.
  • 2017 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा मुकुट गमावण्यापूर्वी माहीच्या नेतृत्वाखाली आम्ही 2016 आशिया कपमध्ये चॅम्पियन झालो. त्यानंतर रोहित शर्माने त्याच्या नेतृत्वाखाली 2018 आशिया चषक आमच्याकडे आणला. म्हणजेच 2011 ते 2022 या काळात आम्ही एक ना अनेक मेगा टूर्नामेंटचे चॅम्पियन होतो.
  • पण 2022 मध्ये आशिया कपच्या अंतिम फेरीत पोहोचू शकलो नाही आणि सुपर-4 फेरीतूनच बाहेर पडलो.
  • याआधी, आम्हाला 2021 मध्ये ICC कसोटी चॅम्पियनशिप जिंकण्याची संधी होती, परंतु संघ अंतिम फेरीत न्यूझीलंडकडून पराभूत झाला.

आता जाणून घेऊया आम्ही गेली 11 वर्षे चॅम्पियन कसे होतो

त्यामागचे सर्वात मोठे कारण होते महेंद्रसिंग धोनीचे कर्णधारपद. 2016 पर्यंत त्यांनी आम्हाला कोणत्या न कोणत्या जागतिक स्पर्धेचे चॅम्पियन बनवले होते. धोनीने 2016 नंतर कर्णधारपद सोडले पण त्याने तयार केलेली टीम पुढील काही वर्षे खेळत राहिला. परिणामी, आम्ही 2018 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आशियाई चॅम्पियन बनू शकलो. पण, 2019 पासून भारताची गाडी रुळावरून घसरायला लागली.

त्या वर्षी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया इंग्लंडमध्ये झालेल्या वनडे वर्ल्डकप उपांत्य फेरीत पराभूत झाला होता. यानंतर 2021 च्या टी-20 विश्वचषकात पुन्हा विराटच्या नेतृत्वाखाली संघ आला, पण यावेळी आम्ही उपांत्य फेरीतही पोहोचू शकलो नाही. याच कर्णधारपदाची पुनरावृत्ती 2022 च्या आशिया कपमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली झाली होती.

अशा वेळी प्रश्न पडतो की धोनीकडे असलेली ती जादूची कांडी कोणती होती, ज्याच्या जोरावर तो वेळोवेळी संघाला चॅम्पियन बनवत असे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे मोठ्या स्पर्धांमध्ये दडपण हाताळण्याची धोनीची क्षमता. जोपर्यंत धोनी कर्णधार होता तोपर्यंत टीम इंडिया किंवा संघातील कोणताही खेळाडू घाबरला नव्हता.

धोनीने त्याच्या प्लेइंग-11 मध्ये सुरुवातीच्या काळात कधीही जास्त फेरफार किंवा बदल केले नाही. यामुळे सर्व खेळाडूंना त्यांची त्यांची भूमिका चांगलीच ठाऊक होती. तो गेल्यानंतर मात्र सगलेच बदलले. आता भारतीय संघ दोन देशांच्या सिरीज खूप जिंकतो, पण एकापेक्षा जास्त देशातील टीमसोबत जेव्हा मैदानात उतरतो त्यावेळी आम्ही मात्र हाराकिरी करतो.

विराट कोहलीही ठरला अपयशी

विराटचा निवडकर्त्यांवर विश्वास नव्हता. 2019 च्या वर्ल्डपूर्वी अंबाती रायुडूची कामगिरी अप्रतिम होती, पण त्याला संघात संधी देण्यात आली नाही आणि त्याच्या जागी विजयशंकर संघाचा भाग बनला. 2019 च्या विश्वचषकात विजयशंकर फ्लॉप ठरला. कर्णधारपदाच्या दबावाखाली त्या स्पर्धेत खुद्द विराटची कामगिरी कमकुवत होती.

2021 च्या टी-20 विश्वचषकातही हेच पाहायला मिळाले. आपल्या गोलंदाजीने संघाला सातत्याने विजय मिळवून देणाऱ्या युझवेंद्र चहलला काढून राहुल चहरला संधी देण्यात आली.

रोहित दडपणाखाली अस्वस्थ होतो आणि प्लेइंग-11 देखील स्थिर नसल्यामुळे विजयाची अनिश्तचा

विराटनंतर रोहितला कर्णधार बनवण्यात आलं. IPL मध्ये मुंबई इंडियन्सला पाच वेळा विजेतेपद मिळवून देणारा हिटमॅन टीम इंडियालाही चॅम्पियन बनवेल या आशेवर. पण, आत्तापर्यंत रोहितने जे काही केले आहे त्याची चांगली परिणाम दिसले नाही. तो स्वतः दुखापतीमुळे अनेक सिरीजमधून बाहेर पडला होता. त्याने टीम इंडियाची कमान हाती घेतल्यापासून, भारताने केवळ टी-20 फॉरमॅटमध्ये 28 खेळाडूंना संधी दिली आहे.

पण, आजपर्यंत टीम इंडिया परिपूर्ण प्लेइंग-11 शोधू शकलेला नाही. याशिवाय दबाव वाढला की रोहितही अस्वस्थ होतो. याचे ताजे उदाहरण म्हणजे आशिया चषकातील पाकिस्तानविरुद्धचा सामना. सामन्यातील एका नाजूक प्रसंगी अर्शदीप सिंगने आसिफ अलीचा झेल सोडला. संघाचा कर्णधार रोहित त्याच्यावर ओरडताना दिसला. अशा परिस्थितीत खेळाडूवर खूप दबाव येतो.

अर्शदीपलाही तसेच झाले. तेही जेव्हा त्याला सामन्याचे शेवटचे षटक टाकावे लागले. ड्रेसिंग रूममध्येही रोहित आणि हार्दिक पंड्या यांच्यातील वादाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता.

वर्ल्डकप अगदी उंबरठ्यावर रोहोचला, तरीही टीम इंडियाचा संघ निश्चित नाही

साधारणपणे, वर्ल्डकपच्या पाच-सहा महिने आधी, संघ त्यांचे प्लेइंग-11 जवळजवळ अंतिम करतात आणि स्पर्धेपूर्वी शेवटचे काही सामने त्याच खेळाडूना मॅनेज करून खेळतात. यावेळी तसे काही घडताना दिसले नाही. आशिया चषकातून बाहेर पडल्यानंतर भारतीय संघात बदल होणार असल्याचे मानले जात आहे.

मात्र, आत कोण असणार आणि कोण बाहेर राहणार हे अद्याप ठरलेले नाही. एवढ्या मोठ्या अनिश्चिततेसह टीम इंडिया एवढ्या मोठ्या स्पर्धेत उतरेल, त्यावेळी चॅम्पियन बनण्याची आशा बाळगणे म्हणजे स्वतःला दिलासा देण्याशिवाय दुसरे काही नाही.

बातम्या आणखी आहेत...