आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Asia Cup Kohli's Unbeaten Century, Bhuvneshwar's 5 Wickets; Team India Won By 101 Runs Against Afghanistan

आशिया कप:काेहलीचे नाबाद शतक, भुवनेश्वरचे 5 बळी; टीम इंडिया अफगाणिस्‍तानविरुध्‍द 101 धावांनी विजयी

दुबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राेहित शर्माला विश्रांती; राहुलच्या नेतृत्वात विजय

सामनावीर विराट काेहलीचे (१२२) नाबाद शतक आणि भुवनेश्वर कुमारच्या (५/४) शानदार गाेलंदाजीच्या बळावर टीम इंडियाने आशिया कपचा शेवट विजयाने गाेड केला. फायनलमधील प्रवेशाच्या आशा संपुष्टात आलेल्या भारतीय संघाने गुरुवारी स्पर्धेतील आपल्या शेवटच्या सामन्यात नबीच्या अफगाणिस्तानला धूळ चारली. भारताने १०१ धावांनी सामना जिंकला. टीम इंडियाने निर्धारित २० षटकांत २ गड्यांच्या माेबदल्यात २१२ धावा काढल्या. प्रत्युत्तरात अफगाणिस्तान संघाला ८ गड्यांच्या माेबदल्यात १११ धावांपर्यंत मजल मारता आली. संघाकडून इब्राहिमने नाबाद (६४) अर्धशतक केले. मात्र, इतर फलंदाजांच्या सुमार खेळीने अफगाणिस्तानचा पराभव झाला. भारताच्या माजी कर्णधार विराट काेहलीची (१२२) नाबाद शतकी खेळी लक्षवेधी ठरली. त्याने २३ नाेव्हेंबर २०१९ नंतर पहिले आंतरराष्ट्रीय शतक साजरे केले. त्याचे टी-२० फाॅरमॅटमधील हे पहिलेच शतक ठरले.

काेहलीने प्रभारी कर्णधार आणि सलामीवीर लाेकेश राहुलसाेबत दमदार सुरुवात केली. यासह त्यांनी संघाला शतकी भागीदारीची सलामी दिली. या दाेघांनी पहिल्या विकेटसाठी ११९ धावांची भागीदारी रचली. त्यामुळे टीम इंडियाच्या धावसंख्येला गती मिळाली. दरम्यान, लाेकेश राहुलने (६२) शानदार अर्धशतकाची नाेंद केली. काेहलीने ४४ धावांवर असताना टी-२० फाॅरमॅटमध्ये आपल्या ३५०० धावा पूर्ण केल्या आहेत. त्याने झंझावात कायम ठेवताना शतक झळकावले.

श्रीलंका-पाक आज लढत
आशिया कपच्या सुपर-४ चा शेवटचा सामना आज शुक्रवारी खेळवला जाणार आहे. दुबईतील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर श्रीलंका आणि पाकिस्तान संघ समाेरासमाेर असणार आहेत. या दाेन्ही संघांना रविवारी हाेणाऱ्या फायनलची तयारी करण्याची एक संधी आहे. त्यानंतर हे दाेन्ही संघ अंतिम सामन्यात किताबासाठी झंुजणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...