आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Asia Cup Pakistan Vs Hong Kong ; Babar Azam Mohammad Rizwan | PAK Playing 11, Today Pakistan Hong Kong Match: If Hong Kong Team Loses, Once Again India Pakistan Thrill...

आशिया कपमध्ये पाकिस्तानचा 155 धावांनी विजय:हाँगकाँगचा पराभव, अवघ्या 38 धावांत संघ गारद; रविवारच्या सामन्यात भारताशी गाठ

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आशिया चषक स्पर्धेत आज पाकिस्तान आणि हाँगकाँग यांच्यातील सामना पाकिस्तानने जिंकला. हाॅंगकाॅंगचा 155 धावांनी पराभव करीत पाकिस्तानने मोठा विजय मिळवला.

नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानी संघाने 20 षटकांत 193/2 धावा केल्या आहेत आणि हाॅंगकाॅंगसमोर 194 धावांचे आव्हान विजयासाठी दिले. हाॅंगकाॅंगला हे आव्हान पेललेच नाही. त्यांचा संपूर्ण संघ अवघ्या 38 धावांत गारद झाला.

रिझवान आणि फखरची उत्तम भागीदारी

कर्णधार बाबर आझमची विकेट लवकर पडल्यानंतर फखर जमान आणि मोहम्मद रिझवान यांनी पाकिस्तानचा डाव सांभाळला. दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी 81 चेंडूत 116 धावांची भागीदारी झाली. दोन्ही फलंदाजांनी आपापली अर्धशतकेही पूर्ण केली.

बाबर आझम पुन्हा फ्लॉप

आजच्या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमची बॅटही खेळली नाही. तो अवघ्या 9 धावा करून बाद झाला. त्याची विकेट एहसान खानने घेतली. आझमची बॅट भारताविरुद्धही खेळू शकली नाही आणि अवघ्या 10 धावा करून तो बाद झाला. बाबर बाद झाल्यानंतर मोहम्मद रिझवानने जबाबदारी स्वीकारली आणि 42 चेंडूत अर्धशतक झळकावले.

पाकिस्तानचे प्लेइंग इलेव्हन: 1. मोहम्मद रिझवान, 2. बाबर आझम (कर्णधार), 3. फखर जमान, 4. इफ्तिखार अहमद, 5. खुशदिल शाह, 6. शादाब खान, 7. आसिफ अली, 8. मोहम्मद नवाज, 9. हरिस रौफ, 10. नसीम शाह, 11. शाहनवाज दहनी

हाँगकाँग प्लेइंग इलेव्हन: निजाकत खान (कर्णधार), 2 बाबर हयात, 3 यासिम मोर्तझा, 4 किंचित शाह, 5 स्कॉट मॅकेनी (विकेटकीपर), 6 हारून अर्शद, 7 एजाज खान, 8 जीशान अली, 9 एहसान खान, 10 आयुष शुक्ला, 11 मोहम्मद गझनफर

सामन्याचे लाइव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा ...

पाकिस्तान आणि हाँगकाँग हेड टू हेड

T-20 इंटरनॅशनल सामन्यात पाकिस्तान पहिल्यांदाच हाँगकाँगविरुद्ध खेळणार आहे. याआधी दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध एकही टी-20 सामना खेळलेले नाही. त्यामुळे हाँगकाँगकडे गमावण्यासारखे असे काही नाही.

हाँगकाँग आणि पाकिस्तान T-20 मध्ये कधीही एकमेकांसमोर आलेले नसतील पण वनडे सामन्यात एकमेकांना सामोरे गेले आहेत. दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध 3 सामने खेळले आहेत. या तिन्ही सामन्यांत पाकिस्तानने हाँगकाँगवर मोठा विजय मिळवला आहे.

पहिल्या सामन्यात भारताने हाँगकाँगचा 40 धावांनी केला पराभव
पहिल्या सामन्यात भारताने हाँगकाँगचा 40 धावांनी केला पराभव
  • आशियाकप 2004 मध्ये पहिल्यांदा पाकिस्तानचा हाँगकाँगशी मुकाबला झाला होता. यामध्ये पाकिस्तानने हाँगकाँगचा 173 धावांनी पराभव केला. या सामन्यात युनूस खानने 144 धावा काढल्या होत्या. युनूसच्या कारकिर्दीतील ही सर्वोत्तम खेळी ठरली होती. तर हाँगकाँगचा डाव हा 165 धावांत आटोपला. या सामन्यात शोएब मलिकने 4 विकेट घेतल्या.
  • यानंतर 2008 आशिया कपमध्ये दोन्ही संघ एकमेकांसमोर आले. या सामन्यातही पाकिस्तानने मोठा विजय मिळवला. या सामन्यात हाँगकाँगचा 155 धावांनी पराभव झाला. या सामन्यात सोहेल तन्वीरने अष्टपैलू कामगिरी करत 59 धावांत 2 बळी घेतले होते. यात पाकिस्तानच्या टीमने 288 धावां काढल्या होत्या तर लक्ष्याचा पाठलाग करताना हाँगकाँगचा संघ 133 धावांवर आऊट झाला.
  • 2008 नंतर दोन आशियाई संघ दशकानंतर आमनेसामने आले होते या सामन्यात हाँगकाँगने पहिल्यांदा फलंदाजी करत पाकिस्तानला 117 धावांचे लक्ष्य दिले होते. तर पाकिस्तानने हे लक्ष्य 158 चेंडू शिल्लक असताना पूर्ण केले. पाकिस्तानच्या उस्मान शिनवारीने सामन्यात 3 बळी घेतले आणि त्याला मॅन ऑफ द मॅच म्हणूनही गौरवण्यात आले.

हाँगकाँग आणि पाकिस्तानचा रेकॉर्ड पाहता, हॉंगकॉंगवर विजय मिळवून पाक टॉप 4 मध्ये पोहोचेल आणि येत्या 4 सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यातला आणखी एक थरार पाहायला मिळेल असेच दिसते.

हाँगकाँगविरुद्ध पाकिस्तानची ही करा किंवा मरो अशी लढत असणार
हाँगकाँगविरुद्ध पाकिस्तानची ही करा किंवा मरो अशी लढत असणार
बातम्या आणखी आहेत...