आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Asia Cup Super 4 India Pakistan Probable Playing Players List | Rohit Sharma Virat Kohli KL Rahul, India Pakistan Thrill Once Again In Asia Cup: The Grand Match Will Be Played On Sunday, Know The Possible Playing 11 Of Both Teams

आशिया कपमध्ये पुन्हा एकदा भारत-पाकिस्तानचा थरार:रविवारी रंगणार महामुकाबला, जाणून घ्या दोन्ही संघांचे संभाव्य प्लेइंग-11

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना. हे ऐकूनच दोन्ही देशातील क्रिकेट चाहत्यांना कोण आनंद झाला असेल हे शब्दात मांडणे खरचं खूप कठीण आहे असे म्हणावे लागेल. गेली अनेक वर्ष दोन्ही देशातील राजकीय आणि सामरीक घडामोडीमुळे दोन्ही टीम एकमेकांविरुद्ध कोणतीही द्विपक्षीय सिरीज खेळू शकले नाहीत मात्र वर्ल्डकप आणि आशियाकप यांसारख्या मेगा टूर्नामेंटमध्ये ते एकमेकांना नक्की सामोरे जातात.

28 ऑगस्टनंतर पुन्हा एकदा 4 सप्टेंबरला बाबर आणि रोहितची टीम एकमेकांशी भिडणार आहे. अशा परिस्थितीत दुबईच्या मैदानावर रोमहर्षक सामन्याचा पारा नक्कीच चढणार आहे.

स्पर्धेत भारतच वरचढ

आशिया चषकाबद्दल बोलायचे तर पाकिस्तान संघाने 2014 पासून भारताविरुद्ध एकही सामना जिंकलेला नाही. 2018मधील आशिया चषक आणि 2016 मध्ये पाकिस्तान भारताकडून दोनदा पराभूत झाला होता. एकूणच आशिया चषक स्पर्धेबद्दल बोलायचे झाले तर भारताने पाकिस्तानविरुद्ध आतापर्यंत 15 पैकी 9 सामने जिंकले आहेत. पाकिस्तान संघाने 5 सामने जिंकले आहेत. पावसामुळे एक सामना रद्द करावा लागला होता.

आता दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन...

बातम्या आणखी आहेत...