आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Asia Cup Team Players List 2022; IND VS PAK Match Super 4 Schedule & Time Table | Cricket News, Asia Cup Super 4 Matches Timetable: Team India To Defeat Pakistan For The Fifth Time In A Row

आशिया कपचे सुपर-4 सामन्यांचे टाईमटेबल:टीम इंडिया पाकवर सलग पाचव्या विजयासाठी उतरणार, जाणून घ्या भारताविरूद्धचे सामने

24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आशियाकपचे साखळी सामने संपले असून आता चारही टीम ट्रॉफी जिंकण्यासाठी आमनेसामने येणार आहे. भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि श्रीलंका हे ते चार संघ आहेत. आशिया कपमधील सुपर-4 टप्प्यातील सामने हे 3 सप्टेंबरपासून सुरू होणार आहेत.

चलातर मग जाणून घेऊया आशिया कपच्या सुपर 4 टीम बद्दल सर्व काही…

आशियाकप मध्ये भारत सलग पाचव्यांदा पाकिस्तानला हरवण्यासाठी उतरणार

साखळी सामन्यांमध्ये भारताने आशिया कपमध्ये सलग चौथ्यांदा पाकिस्तानचा पराभव केला. यापूर्वी 2016 मध्ये एकदा आणि 2018 च्या आशिया कपमध्ये टीम इंडियाने पाकला सलग दोन सामन्यात पराभूत केले होते. आता 4 ऑगस्टला पुन्हा एकदा दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. जर टीम इंडियाने हा सामना जिंकला तर आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध भारताचा हा सलग पाचवा विजय ठरेल.

एकीकडे भारतीय चाहते या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. तर दुसरीकडे, पाकिस्तानचे चाहते आणि स्वता पाकचे खेळाडू मागे झालेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी उत्सुक असतील. याशिवाय भारताला आणखी 2 सामने खेळायचे आहेत.

टीम इंडिया 6 सप्टेंबरला श्रीलंकेविरुद्ध खेळणार आहे. आशिया कपमधील दोन्ही संघांचा हा 21 वा सामना असेल. आतापर्यंत दोन्ही संघांनी एकमेकांविरुद्ध 10-10 असे सामने जिंकले आहेत. तर, 8 सप्टेंबरला भारत-अफगाणिस्तानचा सामना होणार आहे.

पाकिस्तानचे होणारे सामने

ग्रुप स्टेजमध्ये भारताविरुद्ध पराभूत होऊनही पाकिस्तानने टॉप 4 मध्ये स्थान मिळवले आहे. पाकने शुक्रवारी हाँगकाँगचा 155 धावांच्या अशा मोठ्या फरकाने पराभव केला आणि टॉप-4 मध्ये आपले स्थान पक्के केले.

भारतासोबच 4 सप्टेंबरचा सुपर 4 चा पहिला सामना झाल्यानंतर 7 सप्टेंबरला पाकिस्तानचा दुसरा सामना अफगाणिस्तानविरुद्ध दुबईत होणार आहे. तर 9 सप्टेंबरला श्रीलंका आणि पाकिस्तानचा तिसरा सामना दुबईतच होणार आहे

जाणून घ्या टॉप 4 चे संपूर्ण वेळापत्रक

आशियाकप स्पर्धेतील चार संघ आपापसात एकूण 6 सामने खेळणार आहेत. सर्व अव्वल 4 संघ निश्चितपणे एकमेकांविरुद्ध एक सामना खेळतील. सुपर 4 चे 6 सामने संपल्यानंतर दोन्ही संघ अव्वल स्थानावर असतील. त्यांच्यामध्ये 11 सप्टेंबरला अंतिम सामना होणार आहे.

विराट ठरला भारतासाठी ग्रुप स्टेजमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू

भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आशिया कपपूर्वी त्याच्या फॉर्ममध्ये येण्यासाठी संघर्ष करीत होता, मात्र या स्पर्धेमध्ये त्याचा फॉर्म परत आल्याचे दिसून आले. विराटने हाँगकाँगविरुद्ध 6 महिन्यांनंतर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये अर्धशतकी खेळी खेळली आहे. या खेळीसह त्याने आशिया कपमध्ये एकूण 94 धावा केल्या आहेत.

तसेच भुवनेश्वर कुमारही आशिया कपपूर्वी आपल्या फॉर्ममध्ये येण्यासाठी झटत होता. भुवनेश्वरसाठीही ही स्पर्धा आतापर्यंत चांगलीच ठरली आहे. त्याने आशिया कपच्या गटात केवळ 5.85 च्या इकॉनॉमीने धावा देत 5 विकेट्स घेतले आहे.

आता जाणून घेऊया टॉप-4 टीमच्‍या संपूर्ण स्क्‍वॉडबद्दल ...

1. पाकिस्तान

बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम ज्युनियर, नसीम शाह, शाहनवाज दहनी, उस्मान कादिर, मोहम्मद हसनैन.

2. अफगाणिस्तान

मोहम्मद नबी (कर्णधार), नजीबुल्ला झदरन, अफसर झझाई, अजमतुल्ला ओमरझाई, फरीद अहमद मलिक, फझलहक फारुकी, हशमतुल्ला शाहिदी, हजरतुल्ला झाझई, इब्राहिम झदरन, करीम जनात, मुजीब उर रहमान, नजीबुल्ला झदरन, नूरउल्ला खान, रहमान खान, अहमद खान झाझई, समिउल्ला शिनवारी.

3. श्रीलंका

दासुन शनाका (कर्णधार), दानुष्का गुनाथिलका, पथुम निसांका, कुसल मेंडिस, चरित अस्लांका, भानुका राजपक्षे, अशेन बंडारा, धनंजया डी सिल्वा, वनिंदू हसरंगा, महेश थिक्शाना, जेफ्री वांडरसे, प्रवीण जयविक्रम, चमिका नुस्साना नुस्साना, पटुना, नुस्साना, नुस्का, धनंजया डी सिल्वा. , दिनेश चंडिमल.

4. भारत

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, दीपक हुडा, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, आर अश्विन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, आवेश खान .

बातम्या आणखी आहेत...