आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Asia Cup Winner Prize Money Sri Lanka Vs Pakistan | Asia Cup Cup Player Of The Tournament, Riches In Asia Cup: Champion Sri Lanka Has Crores Of Rupees, Pakistan Is Also Rich; 12 Lakhs To Player Of The Tournament

आशिया चषकात धनवर्षा:चॅम्पियन श्रीलंकेला करोडो रुपये, पाकिस्तानही श्रीमंत; प्लेअर ऑफ द टूर्नामेंटला 12 लाख

लेखक: राजकिशोरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आशिया कप 2022 चा चॅम्पियन सापडला आहे. श्रीलंकेने पाकिस्तानचा 23 धावांनी पराभव करत सहाव्यांदा आशियाकप वर आपले नाव कोरले आहे. या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना श्रीलंकेने 170/6 धावा केल्या. त्याच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचे फलंदाज 20 षटकांत 145 धावांमध्ये सर्वबाद झाले.

श्रीलंकेचे दोन खेळाडू भानुका राजपक्षे आणि वानिंदू हसरंगा यांनी अंतिम फेरीत शानदार कामगिरी केली. राजपक्षेने 45 चेंडूत 71 धावा केल्या. तर हसरंगाने अवघ्या 21 चेंडूत शानदार 36 धावा केल्या. त्याने एका ओव्हरमध्ये 3 विकेट्सही घेतल्या. या विजयानंतर आशियाई क्रिकेट परिषदेने श्रीलंकेच्या खेळाडूंवर पैशांचा पाऊस पाडला.

जाणून घेऊ या कोणाला किती पैसे मिळाले ते…

श्रीलंका आणि पाकिस्तानची टीम झाली मालामाल

विजयानंतर आशियाई क्रिकेट परिषदेने चॅम्पियन श्रीलंकेला ट्रॉफीसह सुमारे एक कोटी 19 लाख रुपये दिले. उपविजेत्या पाकिस्तानला सुमारे 59.74 लाख रुपयांचे बक्षीस मिळाले. त्याच वेळी, टूर्नामेंटमधील सर्वोत्तम खेळाडू म्हणून वानिंदू हसरंगा याला 11.94 लाख रुपये आणि सामनावीर भानुका राजपक्षेला 3.98 लाख रुपये मिळाले.

भानूका राजपक्षेने लगावले 9 बाउंड्रीज

पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात सामनावीर ठरलेल्या भानुका राजपक्षेने 157.77 च्या स्ट्राइक रेटने 71 धावा केल्या. राजपक्षेच्या शानदार खेळीमुळेच श्रीलंकेचा संघ 170 धावा करू शकला. राजपक्षेच्या अर्धशतकी खेळीत 9 बाउंड्री लगावल्या.यामध्ये 6 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता

हसरंगा गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीत चमकला

श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू वानिंदू हसरंगा याने संपूर्ण स्पर्धेत फलंदाजी आणि गोलंदाजी यादोन्हीमध्ये त्याने शानदार कामगिरी केली. 25 वर्षीय या खेळाडूने संपूर्ण स्पर्धेत 66 धावा केल्या आणि 9 विकेट्सही घेतल्या. अंतिम सामन्यात त्त्याने घेतलेल्या 3 विकेट्सने संपूर्ण मॅचची दिशाच बदलून टाकली.

पाकिस्तानच्या डावाच्या 17 व्या षटकात त्याने रिजवान (55), आसिफ अली (0) आणि खुशदिल शाह (2) हे तीन फलंदाज बाद केले होते. हा सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला आणि त्यानंतर पाकिस्तानला पुनरागमन करता आले नाही.

बातम्या आणखी आहेत...